Published On : Sat, Jul 13th, 2019

धर्मराज विद्यालयात विविध कार्यक्रमासह वृक्षरोपण

Advertisement

कन्हान : – धर्मराज विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय कांद्री-कन्हान येथे स्थापित राष्ट्रीय ग्रीनसेना व वनविभाग द्वारे अनिल सारवे यांचे मार्गदर्शनात वृक्षदिंडी , वृक्ष वितरण आणि गरीब विद्यार्थ्याना नोटबूक वाटप करून वृक्षरोपण कार्यक्रम थाटात संपन्न करण्यात आला.

शनिवार (दि.१३) ला सकाळी धर्मराज धर्मराज विद्यालय व कनिष्ठ महाविद्याल य कन्हान-कॉंद्री ला वृक्षारोपण कार्यक्रम शाळेच्या मुख्याध्यापिका सौ.प्रमीता वासनिक यांच्या अध्यक्षेत प्रमुख अतिथी मा शरद डोणेकर उपाध्यक्ष जि.प. नागपूर, मा बळवंत पडोळे सरपंच कॉंद्री, सौ.अरूणा हजारे ग्रा प सदस्या, अनिता हाडके उपमुख्यध्यापिका, रमेश साखर कर पर्यवेक्षक यांच्या प्रमुख उपस्थित वृक्षदिंडीचे पुजन करून कार्यक्रमाची सुरूवात करण्यात आली.

Gold Rate
23 Jan 2026
Gold 24 KT ₹ 1,57,800/-
Gold 22 KT ₹ 1,46,800/-
Silver/Kg ₹ 3,29,800 /-
Platinum ₹ 60,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

सर्व मान्यवरां चे व सर्व शिक्षकांचे वृक्ष देऊन स्वागत करण्यात आले. मान्यवरांच्या हस्ते वृक्षारोपण करून विद्यालयातील १२० विद्यार्थ्याना वृक्षाचे वितरण करण्यात आले. वृक्षरोपण ही काळाची गरज या विषयावर भाषण व निबंध स्पर्धा घेण्यात आली. यात प्रथम कु. जान्हवी भोंडे, द्वितीय आचल वैद्य, मयक पाटील, सोफिया सय्यद यांची निवड करून हयांना पुरस्कार देण्यात आले. परिक्षक म्हणुन सुरेंद्र मेश्राम, अनिल मंगर, हरीश पोटभरे, उदयचंद्र भस्मे यांनी कामगिरी बजावली.

तसेच स्व.मोनिका जयस्वाल यांच्या स्मृती प्रित्यर्थ नरेश जयस्वाल यांचे तर्फे गरीब विद्यार्थ्याना नोट बुकांचे वाटप करण्यात आले. उपाध्यक्ष शरद डोणेकर व सरपंच बळवंत पडोळे यांनी वृक्षरोपणाचे महत्व आपल्या मार्गदर्शना तुन सांगितले.

कार्यक्रमाचे सुत्रसंचालन अनिल सारवे तर आभार सुनिल लाडेकर यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीते करिता हरीश केवटे, अनिरुद्ध जोशी, राजुसिंग राठोड, धर्मेंद्र रामटेके, विलास डाखोळे, प्रकाश डुकरे, हरिश्चंद्र इंगोले, संतोष गोन्नाडे, बनकर सर, सचिन गेडाम, विजय पारधी, विद्या बालमवार, मनीषा डुकरे, योगीता गेडाम, करिश्मा नडे यांनी सहकार्य केले .

GET YOUR OWN WEBSITE
FOR ₹9,999
Domain & Hosting FREE for 1 Year
No Hidden Charges
Advertisement
Advertisement