संजय महाजन यांनी केली पाहणी
नागपूर : महापौर श्री. दयाशंकर तिवारी यांचे मार्गदर्शनाखाली वैद्यकीय सेवा व आरोग्य समिती सभापती श्री. महेश (संजय) महाजन यांनी नागपूर शहरातील दहन घाट व ख्रिश्चन /मुस्लिम कब्रस्तानमध्ये ८ जून रोजी पाहणी दौरा केला. ख्रिश्चन कब्रस्तान जरीपटका येथे पिण्याचे पाण्याची व विद्युत पुरवठा नियमित नसल्यामुळे सभापती यांनी संबंधित अधिका-यांना उक्त समस्याचे त्वरीत निवारण करण्याचे निर्देश दिले.
मानकापूर (टाकळी) घाट येथील शवदाहीनी (LPG) त्वरित सुरु करण्यासाठी संबंधित अधिका-यांना निर्देश दिले. त्यानंतर पंचशिल नगर येथील मुस्लिम कब्रस्तान येथे सुध्दा भेट दिली. तेथील व्यवस्था समाधानकारक असल्याचे निदर्शनास आले. जरीपटका येथील मुस्लिम कब्रस्तान जवळच्या फुटपाथवर अतिक्रमण करुन लहान मोठे हाथठेल्यावर चाय नास्ता विकल्या जात असून तेथून निघणारा उष्ट अन्न व कचरा कब्रस्तानच्या भिंतीच्या आतमध्ये टाकण्यात येत असते. तेथील अतिक्रमण हटविण्याचे आरोग्य सभापती यांनी संबंधितांना निर्देश दिले.
निरीक्षण दौ-यात माजी सत्तापक्ष नेता श्री. संदीप जाधव, श्री. राजेश हाथीबेड अध्यक्ष अनु.मोर्चा, श्री. रोहिदास राठौड विभागीय अधिकारी (मुख्यालय), श्री. भुषण गजभिये, स्वा.नि. श्री. मनिष चुटेलकर, स्वा.नि.श्री. रोशन नानेटकर, स्वा.नि.झोन क्र. १० श्री. रोशन जांभुळकर, स्वा.नि.झोन क्र.९, ख्रिश्चन कब्रस्तान चे श्री. मॅथ्युज व श्री. नितीन सोनटक्के, मुस्लिम कब्रस्तानचे श्री. अशरफ खान, श्री. शकील अहमद इत्यादी उपस्थित होते.