Published On : Tue, Jun 8th, 2021

फ्रंट लाईन वर्करांच्या दुचाकीची नि:शुल्क सर्व्हिसिंग करणार

विभा, गीश, नीयत फाउंडेशनचा उपक्रम

नागपूर: आता कोव्हिड कार्यात सेवा देणारे आरोग्य सेवेतील फ्रंट लाईन वर्कर यांच्याबद्दल कृतज्ञता म्हणून त्यांचे दुचाकी वाहनांची नि:शुल्क (फ्री) सर्व्हिसिंग करण्याचा संकल्प काही सेवाभावी संस्थांनी केला आहे. त्याचा शुभारंभ उपायुक्त (महसूल) मिलींद मेश्राम यांनी नुकताच केला. विभा फाऊंडेशन, गीश आणि नीयत फाऊंडेशन तर्फे फ्रंटलाईन वर्कर्सच्या वाहनांची फ्री सर्व्हिसिंग करण्याची व्यवस्था केली आहे.

श्री. आदित्य पुर्णावार आणि श्री. चेतन सरोदे यांनी हया मोहिमेबद्दल सांगितले की दुचाकी वाहनांची नि:शुल्क सर्व्हिसिंग केली जाईल. तथापी सर्व्हिसिंग दरम्यान लागणारे स्पेअर पार्टस, ऑईल बदलण्याची वेळ आली तर त्याचा खर्च वाहन मालकांना दयावा लागेल. महापौर श्री. दयाशंकर तिवारी यांनी त्यांना या उपक्रमासाठी शुभेच्छा दिली आहेत. यासाठी ओशिन पिंपरे 7066678603, अर्पित वाझे 7066678604 किंवा मंगेश बदेल 7066678607 यांच्याशी संपर्क साधावा.