Published On : Tue, Jun 8th, 2021

नारी उपल्लवाडी सदनिकेमध्ये राहणा-यांसाठी रस्ता तयार करा

कांता रारोकर – दिकोंडवार यांनी केली संयुक्त पाहणी

1

नागपूर : मनपा दुर्बल घटक समिती सभापती श्रीमती कांता रारोकर आणि गलिच्छ वस्ती निर्मूलन समिती सभापती श्री. हरीश दिकोंडवार यांनी मंगळवारी (८ जून) रोजी नारी उपल्लवाडी येथे बी.एस.यू.पी.योजने अंतर्गत तयार ५४४ सदनिकेची पाहणी केली.

नारी येथे ईटाभटटी जवळ तयार करण्यात आलेल्या सदनिकांमधून ४१४ सदनिका झोपडपटटी मध्ये राहणा-या लाभार्थ्यांना देण्यात आले आहे. तसेच १३२ सदनिका सध्या रिक्त आहे. हया सदनिका मध्ये राहणा-या नागरिकांना जाण्या-येण्यासाठी रस्ता नाही आहे. तसेच त्यांना सार्वजनिक वाहनाची सेवा सुध्दा उपलब्ध नसल्यामुळे त्यांना त्रास सहन करावा लागतो.

श्रीमती रारोकर आणि ‍दिकोंडवार यांनी येथे राहणा-या नागरिकांसाठी डी.पी.रोड चे बांधकाम लवकरात-लवकर सुरु करण्याची सूचना केली. येथे २४ मीटर आणि १८ मीटर रुंदीचा डी.पी.रोड मंजूर आहे. तसेच त्यांनी सार्वजनिक वाहतुकीची सुविधा करण्याचेपण निर्देश दिले. या सदनिकामध्ये राहणा-या नागरिकांना दररोज कामावर जावे लागते. त्यांना रस्ता नसल्यामुळे पावसाळयामध्ये फारच त्रास होतो. यावेळी मनपाचे उपअभियंता पी.पी.धनकर, श्रीमती वैजयंती आडे, अभियंता प्रतीक गजभिये आणि सामाजिक कार्यकर्ता ममता मिश्रा उपस्थित होते.