नागपूर : शहरातील रामझुला परिसरात शनिवारी रात्री दीड वाजताच्या सुमारास मर्सिडीजच्या धडकेत दोन युवकांचा मृत्यू झाला. मर्सिडीज चालक महिले विरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला. मात्र २४ तासाच्या आताच त्यांना जमीनही मंजूर झाल्याने पोलिसांच्या कार्यप्रणालीवर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात येत आहे. यासंदर्भात ‘नागपूर टुडे’शी बोलतांना झोन ३ चे डीसीपी गोरख भामरे यांनी स्पष्टीकरण दिले.
माहितीनुसार, मोहम्मद हुसैन गुलाम मुस्तफा (वय ३४, रा. नालसाहब चौक) आणि मोहम्मद आतीफ मोहम्मद जिया (वय ३२, रा. जाफरनगर) अशी दोन्ही मृतांची नावे आहेत. माधुरी सारडा (वय ३७), रितीका मालू (वय ३९) अशी धडक देणाऱ्या दोन्ही महिलांची नावे आहेत. रितीका ही महिला कार चालवीत होती. आरोपी महिलेविरोधात पोलिसांनी कलम ३०४(A)अंतर्गत गुन्हा दाखल केला. तसेच पोलिसांनी मर्सिडीज कारही जप्त केली.
प्राथमिक माहितीनुसार चालक महिला मद्यधुंद अवस्थेत नसल्याची माहिती मेडिकल अहवाहलातून समोर आल्याचे भामरे म्हणाले. त्यानुसार न्यायालयाने महिलेला जामीन मंजूर केला. आता महिलेचा रक्ताचा नमुना चाचणीसाठी पाठविण्यात आला असून त्यात काही निघाल्यानंतरच त्यानंरच पुढील सेक्शनस मध्ये वाढ होईल,असेही भामरे म्हणाले. तसेच साक्षीदारांचेही जवाब नोंदविणे सुरू असल्याचे ते म्हणाले.