मुंबई : राज्यात मान्सून पुन्हा सक्रिय झाला असून, पुढील काही तासांत अनेक भागांत मेघगर्जनेसह जोरदार पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे. यामुळे राज्यातील अनेक जिल्ह्यांसाठी यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.
गेल्या काही दिवसांपासून पावसाचा वेग मंदावला होता. मात्र, आता वातावरणात झालेल्या बदलामुळे कोकण, पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातील अनेक भागांत पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळी वारेही वाहू शकतात.
मुंबई, ठाणे, रायगड, रत्नागिरी, पुणे आणि अहिल्यानगर या जिल्ह्यांत मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज आहे. तसेच नाशिक, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, धाराशिव, लातूर, नांदेड, यवतमाळ, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यांनाही यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.
हवामान विभागाने नागरिकांनी अनावश्यक प्रवास टाळावा, तर शेतकऱ्यांनी शेतीची कामे करताना विशेष काळजी घ्यावी, असे आवाहन केले आहे. विजांचा कडकडाट आणि वादळी वाऱ्यांचा धोका लक्षात घेऊन सुरक्षित ठिकाणी राहण्याचा सल्लाही देण्यात आला आहे.
LIVE | NEWS BULLETIN NAGPUR TODAY
अपराधियों की खैर नहीं! गैंग और बदमाशों की बनेगी पूरी ‘कुंडली’ #NagpurNews...
गोंदिया के देवरी में ईद-ए-मिलाद का जश्न! निकली भव्य रैली #EidMilad #EidMiladUnNabi...
मुंबई आंदोलन से पहले रविकांत तुपकर को पुलिस का नोटिस! #RavikantTupkar #KisanAndolan...
शादी का झांसा, बार-बार संबंध और फिर इनकार! #NagpurNews #Sitabuldi #CrimeNews #MaharashtraNews
नागपुर में हथियारबंद बदमाशों का तांडव! दुकान में तोड़फोड़-लूट #NagpurNews #Crime #MIDC...





