नागपूर : नागपूर रेल्वे स्थानकावर सुरक्षा तपासणीदरम्यान रेल्वे पोलिसांनी (जीआरपी) मोठी कारवाई करत ११ किलो ३०० ग्रॅम प्रतिबंधित चंदन जप्त केले. या प्रकरणी एका आरोपीला अटक करण्यात आली असून त्याचा एक साथीदार घटनास्थळावरून पसार झाला आहे. जप्त केलेले चंदन आणि आरोपीला पुढील कारवाईसाठी वन विभागाच्या ताब्यात देण्यात आले आहे.
शुक्रवारी दुपारी सुमारे १२.१५ वाजता प्लॅटफॉर्म क्रमांक १ वर जीआरपीच्या बॉम्बशोधक पथकाकडून नियमित सुरक्षा तपासणी सुरू होती. यावेळी एका प्रवाशाची हालचाल संशयास्पद वाटल्याने त्याच्या बॅगची तपासणी करण्यात आली. सुरुवातीला संबंधित व्यक्तीने तपासणी टाळण्याचा प्रयत्न केला, मात्र पोलिसांनी बॅगची झडती घेतली असता त्यामध्ये मोठ्या प्रमाणात सुगंधी लाकूड आढळून आले.
घटनेची माहिती मिळताच सेमिनरी हिल्स येथील वन विभागाचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी तपासणी केल्यानंतर जप्त करण्यात आलेले लाकूड चंदन असल्याची खात्री झाली. त्याचे एकूण वजन ११ किलो ३०० ग्रॅम असल्याचे निष्पन्न झाले.
या प्रकरणी काटोल तालुक्यातील गोन्ही येथील दिनेश माणिक राऊत याला जीआरपीने ताब्यात घेतले आहे. मात्र त्याचा एक साथीदार पोलिसांची नजर चुकवून फरार झाला असून त्याचा शोध सुरू आहे.
प्राथमिक कारवाईनंतर आरोपी आणि जप्त चंदन वन विभागाच्या ताब्यात देण्यात आले असून, वन विभाग आणि जीआरपी या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.
विशेष म्हणजे, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांच्या नागपूर रेल्वे स्थानकावरील आगमनाच्या पार्श्वभूमीवर सुरक्षा व्यवस्था कडक करण्यात आली होती. याच विशेष तपासणी मोहिमेदरम्यान ही मोठी कारवाई उघडकीस आली.
LIVE | NEWS BULLETIN NAGPUR TODAY
LIVE | NEWS BULLETIN NAGPUR TODAY
अपराधियों की खैर नहीं! गैंग और बदमाशों की बनेगी पूरी ‘कुंडली’ #NagpurNews...
गोंदिया के देवरी में ईद-ए-मिलाद का जश्न! निकली भव्य रैली #EidMilad #EidMiladUnNabi...
मुंबई आंदोलन से पहले रविकांत तुपकर को पुलिस का नोटिस! #RavikantTupkar #KisanAndolan...
शादी का झांसा, बार-बार संबंध और फिर इनकार! #NagpurNews #Sitabuldi #CrimeNews #MaharashtraNews





