Published On : Tue, Sep 10th, 2019

पेंच व कन्हान नदीच्या काठावरील नागरिकांना सतर्कतेचा इशारा

तोतलाडोह धरणात ८५ % पाणी

कन्हान : – अतिवृष्टीने तोतलाडोह धरणाचा जलसाठा ८५% होऊन पाणी साठा वाढत असल्याने पेंच व कन्हान नदीत एक ते दोन दिवसांत पाणी सोडण्यात येणार असल्याने पेंच व कन्हान नदीच्या काठावरील नागरिकांनी सावधगिरी बाळगण्याचा सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

चौराई धरणाच्या पाणलोट क्षेत्रात मोठय़ा प्रमाणात अतिवृष्टी होत असल्या ने तोतलाडोह धरणाच्या येव्या मध्ये मोठय़ा प्रमाणात वाढ झाली आहे. आज दि ९/९/२०१९ ला सकाळी १० वाजे पर्यंत तोतलाडोह धरणाची पाणी पातळी ४८७.४० मी. जिवंत साठा ८२४.९४० दलघमी म्हणजे ८१.१२% झाला आहे.

आणि सायंकाळी ५ वाजता ८५ % झाल्याने येत्या एक ते दोन दिवसांत धरणाच्या सुरक्षिततेच्या दुष्टीने जलाशया तुन विसर्ग नदीत सोडावा लागेल. त्या मुळे नदीच्या पाण्याची पातळी मध्ये वाढ होण्याची शक्यता आहे. सोडव्यावरून सोडण्यात येणार्‍या विसर्गामध्ये येणार्‍या विसर्गा मध्ये कमी जास्त प्रमाणात वाढ घट करण्यात येईल.

यास्तव पेंच व कन्हान नदीकाठच्या पारशिवनी,कामठी, मौदा तालुक्यातील गावातील लोकांनी आवश्यक सावधगिरी बाळगावी व शासनाकडून मिळत असलेल्या सुचनां वर लक्ष ठेवून त्याचे पालन करावे. असे आवाहन उपविभागीय अभियंता पेंच पाटबंधारे विभाग रामटेकचे मा.धोटे, उपविभागीय अधिकारी रामटेक चे मा. जोगेंद्र कटयारे व पारशिवनी चे तहसिलदार वरूण सहारे हयानी केले आहे.

नागरिकांना आपत्कालीन आवश्यक मदत भासल्यास जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, जिल्हाधिकारी कार्यालय, नागपूर टोल फ्री आपत्कालीन क्र. १०७७ व दुरध्वनी क्रं ०७१२-२५६२६६८ संपर्क साधावा.