Published On : Tue, Sep 10th, 2019

रेल्वे कार्यालयातील महिलेचा छळ

Advertisement

विभागातील कामगारांवर आरोप , लोहमार्ग पोलिसांकडे तक्रार

नागपूर: मध्य रेल्वे नागपूर विभागातील कार्यरत एका महिलेचा कार्यालयातील कर्मचाºयांकडूनच मानसिक छळ केल्या जात असल्याचे उघडकीस आले आहे. या प्रकरणी पीडितेने संबधीत विभागप्रमुखांकडे तक्रार केली. मात्र, त्याचा काहीच उपयोग झाला नाही. त्यामुळे दोन दिवसांपूर्वीच त्यांनी लोहमार्ग पोलिसात लेखी तक्रार दिली आहे. या तक्रारीत १२ कर्मचाºयांच्या नावाचा उल्लेख करण्यात आला आहे. या प्रकारामुळे रेल्वे वर्तुळात प्रचंड खळबळ उडाली आहे.

पीडित महिला नागपूर रेल्वेस्थानकाच्या एका विभागात कार्यरत आहे. पीडितेच्या तक्रारीनुसार कार्यालयीन अवधीत काही कर्मचाºयांकडून असभ्य वर्तणूक करण्यात येत आहे. महिलेची मानसिकता वाईट होईल, अशा पध्दतीने त्यांचा छळ केला जात आहे. गेल्या सहा महिन्यांपासून हा प्रकार सुरू आहे. प्रारंभी त्यांच्याकडे दुर्लक्ष केले. परंतु, त्रास असह्य झाल्याने पीडितेने विभाग प्रमुखाशी भेट घेवून या प्रकाराची माहिती दिली. परंतु, त्यावर कुठल्याही प्रकारची उपाययोजना करण्यात आली नाही. शिवाय त्यांना दिलासाही देण्यात आला नाही. असा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे.

वरिष्ठांकडे तक्रार करूनही त्रास सुरूच असल्याने तिने अखेर लोहमार्ग पोलिसांकडे तक्रार दिली. पोलिसांनी घटनेचे गांभीर्य लक्षात घेत प्राथमिक चौकशी सुरू केली आहे. अधिकारी आणि कर्मचाºयांना ठाण्यात चौकशीसाठी बोलाविले असून प्रत्यक्षात विभागात जावूनही सत्य जाणून घेण्याचा प्रयत्न लोहमार्ग पोलिस करीत आहेत. त्यासांदर्भात डीआरएम कार्यालयातील संबंधितांसोबत चर्चा करीत माहिती घेतली जात आहे.

डीआरएम कार्यालयात तक्रार नाही
प्राप्त माहितीनुसार डीआरएम कार्यालयातील वरिष्ठ अधिकाºयांपर्यंत घटनेची माहिती पोहचली आहे. त्यांच्याकडूनही कारवाईच्या सूचना देण्यात आल्या आहेत. एका अधिकाºयाने कर्मचारी महिलेच्या छळाची माहिती आली असल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला. पण, महिलेने प्रशासनाकडे तक्रार दिली नसल्याचे त्यांचे म्हणने पडले.