Published On : Mon, Sep 14th, 2026
By Nagpur Today Nagpur News

वर्धा : गणेशोत्सवासाठी पोलीस सज्ज; शहरात भव्य रूट मार्च

Advertisement

वर्धा : गणेशोत्सवासाठी पोलीस सज्ज; शहरात भव्य रूट मार्च

आगामी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर वर्धा जिल्हा पोलीस दलाने कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी कंबर कसली आहे. नागरिकांमध्ये सुरक्षिततेची भावना निर्माण करण्यासाठी वर्धा शहरात पोलिसांकडून भव्य रूट मार्च काढण्यात आला.

शहरातील प्रमुख बाजारपेठा, गर्दीची ठिकाणे, संवेदनशील भाग, प्रमुख चौक तसेच गणपती विसर्जनाचा मार्ग यांची पाहणी करत स्टँड बायपास ते पोलीस मुख्यालयापर्यंत हा रूट मार्च काढण्यात आला.

गणेशोत्सव काळात गर्दी आणि वाहतूक नियंत्रण, विसर्जन मिरवणुकीचे नियोजन, ध्वनी प्रदूषणावर नियंत्रण तसेच संवेदनशील ठिकाणी विशेष बंदोबस्ताची व्यवस्था करण्यात आली आहे.

Gold Rate
Sept 24,2026 - Time 10.30Hrs
Gold 24 KT ₹ 1 51,900 /-
Gold 22 KT ₹ 1,40,900 /-
Silver/Kg ₹ 2,31,200/-
Platinum ₹ 88,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

पोलीस अधीक्षक सौरभ कुमार अग्रवाल यांनी नागरिकांना गणेशोत्सव शांततेत आणि शिस्तीत साजरा करण्याचे आवाहन केले. मंडळांनी प्रशासन आणि पोलिसांच्या सूचनांचे पालन करावे, तसेच अफवा किंवा सोशल मीडियावरील आक्षेपार्ह संदेशांवर विश्वास ठेवू नये, असे त्यांनी सांगितले.

संशयास्पद व्यक्ती किंवा वस्तू आढळल्यास तात्काळ पोलिसांना माहिती देण्याचे आवाहनही करण्यात आले आहे. “उत्सव आनंदाने साजरा करा, मात्र कायदा हातात घेऊ नका. नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाईल,” असा इशारा पोलीस अधीक्षकांनी दिला.

Advertisement

या रूट मार्चमध्ये पोलीस अधीक्षक सौरभ कुमार अग्रवाल यांच्या नेतृत्वाखाली २ पोलीस अधिकारी, २०० पोलीस अंमलदार, २०० होमगार्ड जवान, २ दंगल नियंत्रण पथके, १ QRT आणि SRPFच्या २ प्लाटून सहभागी झाल्या.

प्रतिनिधी : सतीश काळे, वर्धा

Advertisement
GET YOUR OWN WEBSITE
FOR ₹9,999
Domain & Hosting FREE for 1 Year
No Hidden Charges

Follow Nagpur Today on Google
Add Nagpur Today to your Preferred Sources on Google to see our latest news more prominently in Search.