Published On : Fri, Sep 11th, 2026
By Nagpur Today Nagpur News

वर्ध्यात बैलपोळ्यानिमित्त शेतकरी बांधवांचा सन्मान

अल्लीपूर येथे शंकरपट व्यवस्थापन कमिटीतर्फे शेतकऱ्यांचा भेटवस्तू देऊन गौरव
Advertisement

Auto Draft

वर्धा: जिल्ह्यात दरवर्षीप्रमाणे यंदाही बैलपोळा सण मोठ्या उत्साहात आणि पारंपरिक पद्धतीने साजरा करण्यात आला. यानिमित्त अल्लीपूर येथे शंकरपट व्यवस्थापन कमिटीच्या वतीने शेतकरी सन्मान सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.

शेती आणि बैलजोडीचे अतूट नाते जपत शेतकऱ्यांच्या कष्टाचा गौरव करण्याच्या उद्देशाने कमिटीने गावातील शेतकरी बांधवांचा भेटवस्तू देऊन सत्कार केला. या उपक्रमाला शेतकऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

Gold Rate
Sept 11,2026 - Time 10.30Hrs
Gold 24 KT ₹ 1 52,600 /-
Gold 22 KT ₹ 1,41,600 /-
Silver/Kg ₹ 2,28,800/-
Platinum ₹ 88,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

कार्यक्रमाला शंकरपट व्यवस्थापन कमिटीचे अध्यक्ष श्रीराम साखरकर, माजी ग्रामपंचायत सदस्य गोपाल मेगरे, गोपाल गिरडे यांच्यासह प्रमुख पाहुणे उपस्थित होते. मान्यवरांच्या हस्ते शेतकरी बांधवांना भेटवस्तू देऊन सन्मानित करण्यात आले.

यावेळी गावातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे आयोजन शंकरपट व्यवस्थापन कमिटीने केले.

Advertisement

प्रतिनिधी : सतीश काळे, वर्धा

Advertisement
GET YOUR OWN WEBSITE
FOR ₹9,999
Domain & Hosting FREE for 1 Year
No Hidden Charges

Follow Nagpur Today on Google
Add Nagpur Today to your Preferred Sources on Google to see our latest news more prominently in Search.