Published On : Mon, May 11th, 2020

28 दिवसाच्या कोरोनटाईन नंतर प्रभाग क्र 16 सिलमुक्त

कामठी :- कोरोना विषाणूचा संसर्ग टाळण्यासाठी कामठी तालुका प्रशासनाच्या वतीने करण्यात आलेल्या उपाययोजनेला यश प्राप्त झाले असून आजच्या स्थितीत कोरोना बाधितांची संख्या निरंक असल्याने कामठी तालुका प्रशासनाचे कौतुक करण्यात येत आहे तसेच प्रभाग क्र 16 मध्ये एक नागरिक 12 एप्रिल ला कोरोना बाधित आढल्यानंतर खबरदारी घेण्याच्या दृष्टिकोनातून तालुका प्रशासनाच्या वतीने प्रभाग क्र 16 कंटेन्मेंट झोन जाहीर करून त्यातील 12 ठिकाणी प्रतिबंधित करण्यात आले होते तसेच हा प्रभाग 14 दिवसासाठी सीलबंद करीत कोरोनाबधित आढळलेल्या

या तरुणाला 26 एप्रिल पर्यंत नागपूर ला शासकीय विलीगिकरन गृहात दाखल करण्यात आले होते सदर रुग्णाचा अहवाल निगेटिव्ह आल्यानंतर सदर रुग्ण बरा झाल्याचे गृहीत धरून 26 एप्रिल ला कामठीत परत आले त्यानंतर पुनश्च 14 दिवस त्याला गृहविलीगीकरण कक्षात दाखल करण्याचे आदेशानुसार सदर क्षेत्र 10 मे पर्यंत प्रतिबंधित करण्यात आले होते तर या 28 दिवसाच्या कोरोनटाईन कालावधीत प्रभाग क्र 16 येथील कोरोना ग्रस्त व कोरोना बधितांची संख्या ही निरंक आहे यानुसार 28 दिवसाच्या कोरोनटाईन नंतर आज 10 मे ला प्रभाग क्र 16 कोरोनामुक्त जाहीर करीत सदर परिसर सिलमुक्त करण्यात आले.

Advertisement

संपूर्ण जगात थैमान घातलेल्या कोरोना व्हायरस चा प्रादुर्भाव नियंत्रणात आणण्यासाठी भारतासह महाराष्ट्रात सुद्धा जमावबंदी सह लॉकडाउन जाहीर करण्यात आले याच पाश्वरभूमीवर 22 मार्च ला जनता करफू तर 23 मार्च पासून लॉकडाउन जाहीर करण्यात आले यानुसार कामठी तालुक्यात सुद्धा लॉकडोउन चे पालन करीत कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी तालुका प्रशासनातील विशेषतः पोलीस, आरोग्य व महसूल प्रशासनासह इतर विभागाने केलेल्या उपाययोजनेतून परप्रांत , परगावतुन येणाऱ्या नागरिकांचा शोध घेत , कोरोनाची लक्षणे आढळलेल्या नागरिकांचा शोध घेत जवळपास 622 नागरिकांना कोरिनटाईन करण्यात आले होते या सर्वांचे अहवाल निगेटिव्ह आल्यानंतर त्यांना कोरोनामुक्त करण्यात आले होते त्यातच कामठी नगर परिषद हद्दतील प्रभाग क्र 16 मध्ये पोजिटिव्ह रुग्ण आढळलया नंतर त्या रुग्णाच्या चार कुटुंबीय सदस्य सह इतर 40 असे एकूण 44 लोकांना शासकीय विलीगिकरन कक्षात दाखल करण्यात आले होते 14 दिवसानंतर सदर आढळलेल्या पोजिटिव्ह रुग सह इतर 44 लोकांचे सुद्धा अहवाल निगेटिव्ह आढळले यानुसार

या कालावधीत 79 लोकांना शास्कोय विलीगिकरण कक्षात दाखल करण्यात आले होते या सर्व लोकांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत यानुसार सदर प्रभाग क्र 16 आज सिलमुक्त करण्यात आला असून सध्यस्थीतीत शहरातील 26 व ग्रामीण भागातील 29 नागरिक असे एकूण 55 नागरिक स्वतःचा घरातच होम कोरोनटाईन आहेत .या सर्व परिस्थितीनुसार कामठी तालुका प्रशासनातील तहसिलदार अरविंद हिंगे व पथक , नगर परिषद मुख्याधिकारी रमाकांत डाके व पथक , बीडीओ सचिन सूर्यवंशी व पथक, डीसीपी निलोतपल, पोलीस निरीक्षक संतोष बाकल, पोलीस निरीक्षक देविदास कठाळे,पोलीस निरीक्षक परदेसी, पोलीस निरीक्षक पाल व पथक तसेच आरोग्य विभागातील तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ अश्विनी फुलकर, वैद्यकीय अधीक्षक डॉ धीरज चोखानद्रे व डॉ शबनम खानुनी व सह पथकासह अंगणवाडी सेविका, आशा वर्कर आदी आरोग्य विभाग , महसूल , व पोलीस प्रशासनातील सर्वनो मोलाची भूमिका साकारली परिणामी आज कामठी हे कोरोनामुक्त असल्याने समस्त प्रशासनाचे कौतुक करण्यात येत आहे.

संदीप कांबळे कामठी

Advertisement
Advertisement
Advertisement
Advertisement
Advertisement
Advertisement

Advertisement
Advertisement

 

Advertisement
Advertisement
Advertisement