Published On : Mon, May 11th, 2020

डॉ महेश महाजन वर एट्रोसिटी चा गुन्हा दाखल करा

Advertisement

कामठी ता प्र 10:- कामठी नगर परिषद हद्दीत येणाऱ्या हमालपुरा रहिवासी हरिभाऊ नेवारे ला अतिसाराच्या आजारामुळे शासकीय उपजिल्हा रुग्णालयात 1 मे ला दाखल केले असता 2मे ला रात्री दरम्यान सदर इसम मरण पावल्याने वैद्यकिय सल्लागार समिती चे अध्यक्ष डॉ महेश महाजन यांनी मृतकाच्या नातेवाईकांशी रुग्णालय गाठून उपस्थित महिला वैद्यकिय अधिकाऱ्यांशी शाब्दिक वाद घालत चांगलेच धारेवर घेत या मृत्यू प्रकरणाला रुग्णालयातील वैद्यकीय अधिकाऱ्यांचा हयगय पणा जवाबदार असल्याचा आरोप करीत वैद्यकीय अधीक्षक तसेच वैद्यकीय अधीकारी वर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करून त्यांना निलंबित करण्यात यावे

या मागणीसाठी डॉ महेश महाजन यांनी जुनी कामठी पोलीस स्टेशन पा तक्रार नोंदवित सार्वजनिक आरोग्य मंत्र्यासह वरिष्ठ वैद्यकीय अधिकारी कडे तक्रार करण्यात आली यानुसार नागपूर जिल्हा शल्य चिकित्सक ने यासंदर्भात हरिभाऊ नेवारे मृत्यू प्रकारणात चौकशी करण्यहेतु चार आरोग्य अधिकाऱ्यांची चौकशी समिती नेमून 12 मे ला सकाळी 11 वाजता कामठी येथील शासकीय उपजिल्हा रुग्णालयात ही चौकशी समिती चौकशी करणार आहे तर दुसरीकडे महिला वैद्यकीय अधिकारी डॉ सुषमा नितनवरे यांनी डॉ महेश महाजन विरुद्ध केलेल्या तक्रारीवरून जुनी कामठी पोलीस स्टेशन ला गुन्हा दाखल करण्यात आला मात्र या प्रकरणात डॉ महेश महाजन यांच्यावर अट्रोसिटी चा गुन्हा दाखल करण्यात यावा यासाठी कामठी येथील कांग्रेस च्या वतीने शहराध्यक्ष कृष्णा यादव व इतर , शिवसेना तर्फे शहराध्यक्ष मुकेश यादव, देवेश ठाकरे , बसपा तर्फे किशोर गेडाम, प्रोग्रेसिव्ह मुव्हमेंट तर्फे मनोज रंगारी , तसेच नगर परिषद महिला बाल विकास सभापतो रमाताई नागसेन गजभिये च्या वतीने तहसीलदार अरविंद हिंगे यांच्याकडे सामूहिक निवेदन सादर करण्यात आले.

-मंगळवार 12 मे ला कामठी येथील शासकीय उपजिल्हा रुग्णालयात होणाऱ्या वैद्यकीय समिती च्या चौकशीत चौकशी समिती चे रामटेक उपजिल्हा रुग्णालय चे वैद्यकीय अधीक्षक डॉ प्रकाश उजगरे,कळमेश्वर प्राथमिक आरोग्य केंद्राचे डॉ अमरीश मोहबे,सर्वोपचार रुग्णालय नागपूर चे वैद्यकीय अधीक्षक आर जी शास्त्रकार, वरिष्ठ लिपिक एल जी घोडमारे चा समावेश राहणार आहे तर या चौकशी समितीचा अहवालातुन वैद्यकिय अधीक्षक डॉ धीरज चोखाद्रे, तसेच वैद्यकिय अधिकारी डॉ सुषमा नितनवरे यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल होण्यासह निलंबनाची कारवाहो होणार का? तसेच डॉ महेश महाजन वर कारवाही होणार का हे सुद्धा ठरणार आहे.

संदीप कांबळे कामठी