Published On : Mon, May 11th, 2020

माजी जीप अध्यक्ष यांच्या अथक प्रयत्नाला मिळालेल्या यशातून 5 वर्षांपासून बंद रेशन दुकान उघडले

Advertisement

– गोराबाजार येथील 5 वर्षांपासून बंद स्वस्त धान्य दुकान उघडले

कामठी :-महाराष्ट्र शासनाने लागू केलेल्या अन्न सुरक्षा योजने नुसार प्राधान्य गट तसेच अंत्योदय गटातील शिधापत्रिका धारकानाच स्वस्त धान्य दुकानातून धान्य मिळत होते तर प्राधान्य अन्न सुरक्षेचा लाभ न मिळणाऱ्या केशरी शिधा पत्रिका धारकांना स्वस्त धान्य दुकानातून धान्य मिळत नव्हते या पाश्वरभूमीवर कामठी छावणी परिषद अंतर्गत येणाऱ्या गोराबाजार येथिल जसराज जैन परवाना धारक असलेल्या स्वस्त धान्य दुकान दाराकडे सर्व केशरी रेशनकार्ड धारक असल्याने हे रेशन दुकान नामधारी ठरल्याने हे रेशन दुकान मागील पाच वर्षांपासून बंद होते तर सुरू असलेल्या या लॉकडाउन मध्ये कुणीही नागरिक अन्न धान्यापासून वंचित न राहावे यासाठी अंत्योदय व प्राधान्य योजनेतील शिधापत्रिका धारकासह केशरी रेशन कार्ड धारकानाही धान्य वितरण करण्याची परवानगी दिल्याने या बंद रेशन दुकानातून हक्काच्या मिळणाऱ्या धाण्यापासून वंचित राहण्याची पाळी गोराबाजार च्या केशरी शिधापत्रिका धारकावर आली होती

अश्या परिस्थितीत गोराबाजार च्या नागरिकांनी न्यायिक हक्कासाठी नागपूर जिल्हा परिषद चे माजी अध्यक्ष सुरेशभाऊ भोयर यांच्याकडे धाव घेतली असता यासंदर्भात सुरेश भोयर यांनी गंभीर्यचो भूमिका घेत मागील पाच वर्षांपासून गोराबाजार येथे बंद असलेली जसराज धनराज जैन नामक परवाना असलेली रेशन दुकान उघडण्यात यश गाठले व केशरी शिधापत्रिकाधारक नागरिकांना रेशन मिळत असल्याने नागरिकांत आनंदाचे वातावरण पसरले असून या सर्व केशरी शिधापत्रिका धारक तसेच जसराज जैन या स्वस्त धान्य दुकांदारकडून सुरेश भोयर यांचे आभार मानण्यात आले.

सध्या सर्वत्र थैमान घातलेल्या कोरोना व्हायरस चा संसर्ग नोयंत्रणात आणण्यासाठी शासनाच्या वतीने लागू करण्यात आलेल्या लॉकडाऊन मध्ये कुणीही अन्न धान्यापासून वंचित न राहावे यासाठी स्वस्त धान्य दुकानातून धान्य वितरण करण्यात आले त्यातच प्रधानमंत्री गरीब कल्याण योजने अंतर्गत शिधापत्रिके वरील प्रति सदस्यांना 5 किलो मोफत तांदूळ वितरित करण्यात आले होते मात्र प्राधान्य व अन्न सुरक्षा योजनेचा लाभ न मिळणाऱ्या केशरी शिधापत्रिका धारकांनाही शासनाने धान्य वितरण करण्याची परवानगी देत कुणीही अन्न धान्यापासून वंचित राहणार नाही याची पूर्णता जाणीव घेण्यात आली यानुसार समस्त धान्य दुकांनासह गोराबाजार येथील जसराज जैन या स्वस्त धान्य दुकानातुन केशरी शिधापत्रिका धारकांना अनुक्रमे 8 रुपये व 12 रुपये किलो या दराने प्रति व्यक्ती 3 किलो व 2 किलो गहू वितरित करण्यात येत आहे.

संदीप कांबळे कामठी