Published On : Wed, Jun 26th, 2019

प्रभाग क्र 15 च्या पाणी समस्या लागणार मार्गी

Advertisement

नगरसेवक निरज लोणारे यांच्या प्रयत्नला यश प्रभाग क्र.१५मधे लवकरच लोकांना मिळणार पिण्याचे पुरेसे पानी

कामठी :-स्थानिक कामठी नगर परिषद अंतर्गत येणाऱ्या प्रभाग क्र.15 मधील रामगढ़,आनंद नगर ,सैलाब नगर ,शिवनगर अनाजगोडावून,गौतम नगर छावनी या परिसरात पिण्याच्या पाण्याची गंभीर समस्या लक्षात घेत प्रभागाचे नगरसेवक नीरज लोणारे यांनी केलेल्या अथक पाठपुरव्याला झालेल्या यशप्राप्त मुळे या परिसरात होणारी पाण्याची समस्या लवकरच मार्गी लागणार आहे.

यानुसार नगरसेवक नीरज लोणारे यांनी नागरी दलित वस्ती सुधार योजने अंतर्गत कामठी नगर परिषद क्षेत्रातील प्रभाग क्र 15 मधील विविध ठिकाणी पिण्याची पाईप लाईन टाकन्याच्या बांधकाम नकाशाला मंजुरी प्रदान करण्यात यावी यासाठी नगर रचना विभागाची मंजुरी मिळविण्यासाठी केलेल्या अथक प्रयत्नाला यश आले व प्रस्तुत सातही कामाला मंजुरी देण्यात आली.

या मंजूर कामात गौतम नगर छावणी येथे डॉ बाबासाहेब आंबेडकर पुतळा ते कुणाल गजवे यांच्या घरापर्यंत 110 मी मी व्यासाची पाण्याची पाईप लाईन , डॉ बाबासाहेब आंबेडकर पुतळा ते श्री खोपडे यांच्या घरापर्यंत 110 मी मी व्यासाची पाण्याची पाईप लाईन , सैलाब नगर येथे विष्णू बोरकर ते पुष्पां डोंगरे यांच्या घरापर्यंत 110 मी मी व्यासाची पाण्याची पाईप लाईन, सैलांब नगर येथील कल्पना दहाट ते रविना चव्हाण यांच्या घरापर्यंत 110 मी मी व्यासाची पाण्याची पाईप लाईन, शिवनगर येथील अनाज गोडाऊन ते पिंटू यादव यांच्या घरापर्यंत 110 मी मी व्यासाची पाण्याची पाईप लाईन, सुशांत गजभिये ते चांभार टोली ते हंसराज वैज्ञ यांच्या घरापर्यंत 160 मी मी व्यासाची पाईप लाईन , किसन श्यामकुवर ते ललिता काटे यांच्या घरापर्यंत 110 मी मी व्यासाची पिण्याची पाईप लाईन घालण्याच्या कामालामंजुरी देण्यात आली असून लवकरच या कामाला सुरुवात होऊन पाण्याची भीषण समस्या ही सुटणार असल्याने नागरिकाच्या वतीने नगरसेवकाचे आभार मानण्यात येत आहेत.

बॉक्स:-नगरसेविका संध्या रायबोले:-यासंदर्भात प्रभागाच्या नगरसेविका संध्या रायबोले यांनी सांगितले की प्रभागातील पाण्याची समस्या सोडविण्यासाठी संबंधित नगर परिषद तसेच पालकमंत्री ना बावनकुळे यांच्याकडे सतत पाठपुरावा करण्यात आला आहे .तसेच पाण्याच्या समस्या संदर्भात होणारे कामे हे कुणाच्या वयक्तिक खर्चातून नसून शासकीय निधीतून होणार आहे तसेच शासकीय निधी ही कुणाच्या बापाची नसून आमच्या हक्काची आहे तेव्हा हा शासकीय निधी नाही कुणाच्या बापाचा, पैसा आमच्या हक्काचा …तेव्हा उगीच केल्याचा गाजावाजा करणे योग्य नाही.

संदीप कांबळे कामठी