Published On : Wed, Jun 26th, 2019

स्थायी समिती सभापतींकडून गोरेवाडा तलावाच्या कार्याचा दररोज आढावा

Advertisement

नागपूर : नागपूर महानगरपालिकेच्या वतीने गोरेवाडा तलावाच्या खोलीकरणाचे कार्य सुरू आहे. या कार्यामध्ये येणारे अडथळे दूर करून काम लवकरात लवकर पूर्ण व्हावे यासाठी स्थायी समिती सभापती प्रदीप पोहाणे यांच्या मार्फत दरोराज पाहणी करून आढावा घेण्यात येत आहे.

मंगळवारी (ता.२५) झालेल्या पाहणी दौ-यामध्ये स्थायी समिती सभापती प्रदीप पोहाणे यांच्यासह सर्वश्री मनोज अग्रवाल, हर्षद घाटोळे, भूषण इंगळे, शशी माहेश्वरी, दिपक चांदेकर आदी उपस्थित होते.

मागील शंभर वर्षात पहिल्यांदाच ओढवलेल्या परिस्थितीवर मनपाने पुढाकार घेतल्यानंतर मागील सहा दिवसांपासून गोरेवाडा तलावाच्या खोलीकरणाचे काम सुरू आहे. या खोलीकरण कार्यामध्ये सुमारे तीन फुटापर्यंत माती काढण्यात आल्यानंतर तलावाला पाणी लागले त्यामुळे खोलीकरणाच्या कार्याला यश मिळत असल्याने या कार्याची गती वाढविण्यात आली. या कामासाठी मनपाच्या पदाधिकारी, अधिकारी व कर्मचा-यांकडून प्राधान्याने काम केले जात आहे.

कामाचा वेळावेळी आढावा घेण्यात येत आहे. खोलीकरणाच्या कामामध्ये चार पोकलेन व १० टिप्पर कार्यरत आहेत. नाग नदी स्वच्छता कार्य पूर्ण होताच या कार्यामध्ये असलेले सर्व पोकलेन व टिप्पर गोरेवाडा तलावावर स्थानांतरीत करून काम लवकरात लवकर पूर्ण करा, असे निर्देश स्थायी समिती सभापती प्रदीप पोहाणे यांनी दिले.