Published On : Sat, Jan 15th, 2022

जागे व्हा, जागे व्हा, च्या घोषणा मविआ सरकारने शेतकर्‍याला 50 हजार

रुपये एकरी मदतीची घोषणा करावी आ. बावनकुळेंच्या नेतृत्वात भाजपाचे आंदोलन

नागपूर: भारतीय जनता पक्षातर्फे आज संविधान चौकात आ. चंद्रशेखर बावनकुळे यांच्या नेतृत्वात शेतकर्‍यांच्या मदतीसाठी भर पावसात आंदोलन करण्यात आले. शासनाने शेतकर्‍याला एकरी 50 हजार रुपये मदतीची घोषणा त्वरित करावी अशी मागणीही यावेळी करण्यात आली.

Advertisement

या संदर्भात आ. बावनकुळे यांनी पत्रकारांना सांगितले की, गेल्या 4 दिवसांपासून विदर्भात अवकाळी पाऊस आणि गारपिटीने तडाखा दिला आहे. अवकाळी पाऊस व गारपिटीमुळे शेतकर्‍याचा कापूस, तूर, हरबरा, गहू, भाजपीला अशा सर्वच पिकांचे नुकसान झाले आहे. शेतकर्‍याच्या हातात आलेले पीक नैसर्गाच्या अवकृपेमुळे गेले आणि शेतकरी आर्थिक अडचणीत सापडला आहे.

यापूर्वी देवेंद्र फडणवीस सरकारने गारपीटग्रस्त जिल्ह्याला प्रत्येकी 29 कोटी रुपये विशेष अनुदान दिले होते, असे सांगताना आ. बावनकुळे म्हणाले- मविआ सरकार तर शेतकर्‍याच्या बांधावर जाणार होते, ते तर मंत्रालयातही येत नाही. पालकमंत्री गायब झाले आहेत. अशा स्थितीत विदर्भातील शेतकर्‍याकडे सरकारचे लक्ष नाही. मविआ शासनाने प्रत्येकी 50 हजार रुपये प्रति एकर याप्रमाणे शेतकर्‍याला नुकसानभरपाई द्यावी, या मागणीसाठी हे आंदोलन करण्यात येत असून सरकारने त्वरित आपली मदत घोषित करावी. अन्यथा भाजपातर्फे गावागावात जाऊन आंदोलन करण्यात येईल, असा इशाराही आ. बावनकुळे यांनी दिला.

या आंदोलनात आ. टेकचंद सावरकर, माजी विरोधीपक्ष नेते संदीप सरोदे, अनिल निधान, किशोर रेवतकर, अजय बोढारे, उकेश चव्हाण, लीलाधर भोयर, नरेंद्र धानोले, अशिष राऊत व भाजपाचे सर्व जिल्हा पदाधिकारी व प्रमुख कार्यकर्ते उपस्थित होते.

Advertisement
Advertisement
Advertisement
Advertisement
Advertisement

Advertisement
Advertisement

 

Advertisement
Advertisement
Advertisement