Published On : Thu, Jul 18th, 2019

कामठी नगर परिषद ला बळींची प्रतीक्षा,

धोकादायक जीर्ण इमारतीकडे दुर्लक्ष: केवळ नोटीस बजावण्याचेच सोपस्कार,

कामठी :-पावसमुळे मुंबईतील मालाड येथे जीर्ण इमारत कोसळून 8 ते 10 जणांना जीव गमवावा लागल्याची घटना मंगळवारी (16)ला घडली तसेच पुण्यातील कोडवा येथे संरक्षक भिंत कोसळून जवळपास 40 जणांचा मृत्यू झाल्याची घटना घडल्याने जीर्ण इमारतींचा मुद्दा ऐरणीवर आला आहे .कामठी शहरात सुद्धा अश्याआ 16 च्या वर जीर्ण इमारती असून त्या केव्हाही कोसळण्याची शक्यता,नाकारता येत नाही .

त्यामुळे वेळीच यावर उपाय योजना केली नाही तर कामठी शहरातही मुंबईच्या घटनेची पुनरावृत्ती होण्याची शक्यता नाकारता येत नाही .मागच्या वर्षी या इमारती मालकांना कामठी नगर पालिकेने ह्या जीर्ण इमारती पाडून घेण्याकरिता,नोटीस बजावल्या परंतु त्यावर काहीच कारवाही झाली नाही त्यामुळे कामठी नगर परिषद बळींची प्रतीक्षा तर करत नाही ना? या चर्चेला शहरात उधाण आहे.

कामठी शहरात शंकरलाल चौक यासह इतर सोळा च्या वर ठिकाणी जुन्या जीर्ण इमारती असून त्या कधीही कोसळतील अशी परिस्थिती आहे. या इमारतीत पावसाळ्यातील पाणी भिंतीत, छतात मुरून इमारती कोसळू शकतात ज्यामुळे जीवितहानी होण्याची शक्यता नाकारता येत नाही .

नगर परिषद च्या विभाग नोहाय पथक ने जीर्ण इमारतींची माहिती संकलित करून मागच्या वर्षी याजीर्ण इमारती मालकांना नोटीस बजावल्या होत्या तरीसुद्धा या इमारती मालकांनी या धोकादायक इमारती पाडल्या नसल्याने धोकादायक स्थिती निर्माण होण्याची शक्यता,नाकारतायेत नाही याकडे नगर परिषद ने लक्ष देणे गरजेचे आहे.

नगर रचना विभागाने संबंधित जीर्ण इमारती मालमत्ता धारकांना नोटीस बजावल्या आहेत त्यांना जीर्ण इमारत पाडण्यास सांगण्यात आले मात्र आज नोटीस बजावून वर्ष लोटून दुसरे पावसाळा ऋतू लागला तरी इमारती पाडण्यात आलेले नाही अशा परिस्थितीत त्यांच्याकडून इमारत न पाडल्यास नगर परिषद ती जीर्ण इमारत पाडू शकते अशी अधिनियमात तरतूद आहे तेव्हा नगर परोषद ने या परिस्थिती कडे दुर्लक्ष केल्यास मुंबईत व पुण्यात घडलेल्या घटनेच्याअ पुनरावृत्तीला वेळ लागणार नाही.

संदीप कांबळे कामठी