Published On : Thu, Jul 18th, 2019

आरोग्य विभागातर्फे गरोदर मातांना कालबाह्य औषधीचे वितरण

जनहित वाहिनीने दोषीवर कारवाई करण्याची केली मागणी

कामठी : पंचायत समिती कामठी अंतर्गत येणाऱ्या शहरीकृत असणाऱ्या रनाळा गावात दर महिन्याला गरोदर मातांना तपासणी शिबिर घेण्यात येते त्यानुसार 20 जून रोजी तपासणी शिबिर घेतल्यानंतर आरोग्य सेविकेने गरोदर मातांना आयरन आणि फॉलिक ऍसिड चे गोळ्या वितरित केल्या व त्या नियमित घेण्यास सांगितले काहींनी तर त्या गोळ्या नियमित खाण्यास सुरुवात केली पण काही सजग महिलांना ह्या कालबाह्य असल्याच्या निदर्शनात आले.

एकीकडे शासन गरोदर स्त्रिया साठी वेगवेगळ्या योजना राबवतात तर दुसरीकडे यंत्रणा दुर्लक्ष करीत त्यांच्या जीवाशी खेळतात ज्या गरोदर महिलांनी या औषधी सेवन केल्या त्याच्या दुष्परिणाम मातेवर व मुलावर झाले तर त्याची जबाबदारी शासन घेणार काय ?

करिता या अतिशय गंभीर विषयावर लक्ष घेऊन त्वरित नवीन औषधी उपलब्ध करावी व कालबाह्य औषध ज्या यंत्रणेतून आरोग्यसेविका पर्यंत आली व आरोग्य सेविकांनी ही न तपासता ते गरोदर मातांना दिल्या त्यावरही कारवाई करण्यात यावी अशी मागणी चे निवेदन जनहित वाहिनी तर्फे उपसंचालक आरोग्य सेवा नागपूर ,पालक मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, मुख्य आरोग्य अधिकारी जिल्हा परिषद नागपूर, खंडविकास अधिकारी पंचायत समिती कामठी व आरोग्य अधिकारी पंचायत समिती कामठी यांना दिली .

याप्रसंगी संघटनेचे अध्यक्ष श्रावण केझळकर, उदय सिंग यादव ,संजय घुघुस्कार ,मुकेश बडगे, इस्माईल खान ,जयवंत ठेंगे, सतीश नवले, बॉबी महेंद्र, हेमराज पगाडे आदी उपस्थित होते

संदीप कांबळे कामठी