Published On : Thu, Jul 8th, 2021

वाडी व ग्रामीण परिसरात धो-धो पावसाने “चहूकडे पाणीच पाणी

Advertisement

– शेतकऱ्यां सह नागरिक ही सुखावले


वाडी– गत 10 दिवसापासून पावसाने दडी मारल्याने नागरिकांसह खास करून ग्रामीण भागातील शेतकरी वर्ग चिंतेत दिसत होता. मात्र गुरुवारी दुपारी जोरदार पावसाने चहूकडे पाणीच पाणी झाल्याने पावसाने आपला अनुशेष भरून काढुन चिंतातूर शेतकरी,व दमट वातावरणाने त्रस्त नागरिकांनाही दिलासा मिळाल्याचे दिसून आले.

काल गुरुवारी सकाळपासून च पावसाचे ढगाळ वातावरण दिसून येत होते.मात्र 10 च्या सुमारास वाडी व ग्रामीण परिसरात जोरदार आगमन केले.सतत 4 तास जोरदार पावसाने मग मात्र सर्वत्र पाणीच पाणी दिसून आले.वाडी परिसरातील अमरावती महामार्ग शेजारील दत्तवाडी,खड्गाव वळण,या ठिकाणी जलसंचय झाल्याने वाहतुकीला अडथळा निर्माण झाला,गजानन सोसायटी येथील क्रीडा मैदानाला देखील तलाव सदृश चित्र निर्माण झाले.

Advertisement
Advertisement

या सोबत आदर्शवाडी, खड्गाव मार्ग,दत्ता व्यावसायिक संकुल, मारूती नगर व्यवसायिक परिसर,सत्य साई सोसायटी,शाहू ले आऊट,दौलत वाडी ,शिवशक्ती नगर,मंगलधाम परिसर इ.तील खोलगट भाग,रस्त्यावरील खड्डे पावसाने भरून गेले.आधीच व्यवसाय संकटात असताना या दिवसभराच्या पावसाने छोटे विक्रेते ग्राहकांची वाट पाहत व पावसापासून वस्तू सुरक्षित करताना दिसून आले.

मात्र या पावसाने 7 दिवसापासून गर्मी व दमट वातावरणाने त्रस्त नागरिकांना दिलासा मिळाला व वातावरण थंड झाल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त केले.मात्र या पावसाने लावा,वड धमना,खड्गाव,चिंचोली,येरला,फेटरी, बोढाला इ.परिसरसतील शेतकरी यांचे चेहरे मात्र खुलून गेले.दडी मारलेल्या पावसामुळे पहिली पेरणी वाया जाते की काय अशी चिंता सतावत असताना या जोरदार पावसाने शेतकऱ्यांना निश्चितच दिलासा मिळाला आहे.

Advertisement

Advertisement
Advertisement
 

Advertisement
Advertisement
Advertisement
Advertisement
Advertisement