Advertisement

नागपूर: आगामी लोकसभा सार्वत्रिक निवडणूका-2019 मध्ये कोणताही मतदार हा मतदार नाव नोंदणीपासून वंचित राहू नये म्हणून उद्या शनिवार दिनांक 23 व रविवार दिनांक 24 फेब्रुवारी रोजी मतदार नोंदणीची विशेष मोहिम राबविण्यात येत आहे.
ज्यांचे मतदार यादीत नाव नाही अशा वंचित नागरिकांना मतदार नोंदणीसाठी आणखी संधी मिळावी, मतदार यादीत नाव समाविष्ट करणे, नावाची वगळणी, मतदार यादीतील तपशिलातील दुरुस्ती, मतदार संघामधील पत्त्यांतील बदल करावयाचा आहे, अशा नागरिकांनी अनुक्रमे अर्ज क्रमांक 6,7,8,व 8अ भरुन द्यावा.
Advertisement
मतदाराने मतदार नाव नोंदणीसाठी आवश्यक कागदपत्रासह आपल्या जवळचे मतदार केंद्र, मतदार नोंदणी अधिकारी यांचे कार्यालय किंवा मतदार मदत केंद्रावर सादर करावा. मोठ्या प्रमाणात मतदारांनी मतदार यादीत नाव नोंदवावे, असे आवाहन जिल्हाधिकारी अश्विन मुदगल यांनी केले आहे.
Advertisement
Advertisement

Advertisement
Advertisement
Advertisement

Advertisement
Advertisement

Advertisement
Advertisement