भाजपा उमेदवाराला मतांचे कर्ज द्या : बावनकुळे

उमरेड मतदारसंघात 10 गावांमध्ये झंझावाती दौरा

नागपूर: भाजपाचे उमेदवार सुधीर पारवे यांना मतदारांनी मतांचे कर्ज आहे. तुमच्या मताचे कर्ज विकास कामे करून व्याजासह परत करू असे आवाहन पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज उमरेड विधानसभा मतदारसंघातील मतदारांना केले. सोबतच भाजपाच्या कार्यकर्त्यांनी मतदानाची टक्केवारी मागील निवडणुकीपेक्षा अधिक कशी होईल यासाठी प्रयत्न करण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या.

उमरेड विधानसभा मतदारसंघात बेला, सिर्सी, नांद, उदासा, वायगाव, मकरधोकडा, पाचगाव, मांढळ, पचखेडी, वेलतूर या दहा ठिकाणी झंझावाती दौरा केला. या दौर्‍यात पालकमंत्र्यासोबत आ. सुधीर पारवे, भाजप नेते आनंदराव राऊत, जिल्ह्याचे महामंत्री अरविंद गजभिये व अन्य उपस्थित होते.

पालकमंत्र्यांनी ÷10 गावांमध्ये कार्यकर्ते आणि नागरिकांच्या संयुक्त बैठकी घेतल्या. भारतीय जनता पक्षाच्या शासनाने या जिल्ह्यातील प्रत्येक मतदारसंघात मोठ्या प्रमाणात विकास कामे केली आहेत. शासनाच्या 45 योजना प्रत्येक मतदारसंघात आणून त्याचा लाभ लोकांना दिला आहे. यापुढील काळातही यापेक्षाही अधिक विकासाची कामे होणार आहेत. उदासीन काँग्रेसच्या 65 वर्षाच्या काळात कधीच या जिल्ह्याने एवढ्या मोठ्या प्रमाणात कामे पाहिली नव्हती, याकडे पालकमंत्री बावनकुळे यांनी लक्ष वेधले.


भाजपाच्या कार्यकर्त्यांनी देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात राज्य शासनाने आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातील केंद्र शासनाने गावागावात आणलेल्या योजनांची माहिती मतदारांना द्यावी. प्रत्येक घराघरात कार्यकर्त्यांनी मतदारांशी संपर्क करावा. पक्षाने दिलेले सर्व कार्यक्रम काटेकोरपणे राबवा अशी सूचनाही पालकमंत्री बावनकुळे यांनी या दौर्‍यात सर्व ठिकाणी केली.

आ. सुधीर पारवे
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या नेतृत्वामुळे या मतदारसंघात आपण विकास करू शकलो, असे सांगताना आ. सुधीर पारवे म्हणाले- कोट्यवधीचा निधी मिळाल्यामुळे या मतदारसंघात विकास कामे होऊ शकली. पालकमंत्री बावनकुळे यांनी विजेच्या यंत्रणा सक्षम करणे, नवीन ट्रान्सफॉर्मर आणि नवीन उपकेंद्रांसाठी कोट्यवधीचा निधी या मतदारसंघाला दिला आहे. आज उमरेड-भिवापूर-कुही भारनियमनमुक्त झाले आहे. अशीच विकास कामे आगामी काळातही केली जाणार असल्याचेही ते म्हणाले.