भाजपा कार्यकर्त्यांच्या कामठी मतदारसंघात मॅरॉथॉन बैठकी आणि जनसंपर्क

नागपूर: भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांनी कामठी विधानसभा मतदारसंघातील गावागावात व शहर भागातील वस्त्यांमध्ये कार्यकर्त्यांच्या झंझावाती बैठकी घेणे सुरु केेले आहे. तसेच काही कार्यकर्त्यांच्या गटांनी मतदारांशी घरोघरी जाऊन संपर्क केला. घरापर्यंत भाजपाचे कार्यकर्ते पोहोचत असल्यामुळे नागरिकांमध्येही उत्साह दिसून आला.

मिहानमधील खापरी गावठाण, पुनवर्सन झालेल्या गावांमध्ये व वस्त्यांमध्ये भाजपाच्या कार्यकर्त्यांनी पालकमंत्र्यांनी केलेल्या आवाहनाची पत्रके पोहोचवून प्रचार केला आहे. बेलतरोडी भागात वॉर्ड नं 6 मध्ये घरोघरी कार्यकर्त्यांनी संपर्क केला. यावेळी बेसा उपसरपंच जितेंद्र चांदूरकर आणि त्यांची चमू उपस्थित होते. उद्या सकाळी 9 वाजता वॉर्ड नं. 1 बेलतरोडी गाव व राकेश लेआऊट 6, कुणाल अपार्टमेंट, शौर्या अपार्टमेंट, सोमनाथ बिल्डिंग या ठिकाणी पालकमंत्र्यांच्या आवाहनाची पत्रके वाटण्यात येणार आहेत.

मौदा तालुक्यातील धानला, दहेगाव, भोवरी, चिखलाबोडी, निहारवाणी येथे पेजप्रमुख व बुथप्रमुख कार्यकर्त्यांच्या बैठकी घेण्यात आल्या. मोठ्या संख्येने कार्यकर्ते या बैठकीला उपस्थित होते. खरबी येथील प्रचार सभेत शुभांगी गायधने व चमूने घरोघरी जाऊन नागरिकांच्या भेटी घेतल्या. उमरगाव येथे नित्यानंद महाराजांच्या उपस्थितीत कार्यकर्त्यांचा मेळावा घेण्यात आला.

नगर पंचायत महादुला येथे बुथ क्रमांक 32, 34, 33, 16, 21, 22, 18, 10, 9, 22 या ठिकाणी कार्यकर्त्यांच्या बैठकी घेऊन नागरिकांनी भाजपा कार्यकर्त्यांनी संपर्क केला. याप्रमाणे संपूर्ण मतदारसंघात कार्यकर्त्यांचा जोरदार प्रचार सुरु झाला आहे.