Published On : Tue, Jan 1st, 2019

बालवयातच व्यवहारज्ञानाचे धडे आवश्यक – विवेक पाटील

कन्हान : – बालवयात व्यवहार ज्ञानाचे धडे दिल्यास चांगले संस्कारक्षम पिढी घडविण्यास मदत होते, असे प्रतिपादन युवा पत्रकार विवेक पाटील यांनी व्यक्त केले. स्थानिक धर्मराज प्राथमिक शाळेत आज बाल आनंद मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी युवा पत्रकार विवेक पाटील तर प्रमुख पाहुणे म्हणून गाम पंचायत सदस्य सहादेव मेंघरे, शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षा अंजली पवार, उमेश कडू, मुख्याध्यापक आशा हटवार,माध्यमिक विभाग प्रतिनिधी दिनेश ढगे, ज्येष्ठ शिक्षक आत्माराम बावनकुळे प्रामुख्याने उपस्थित होते.

बाल मेळाव्याचे आयोजन उपक्रमशिल शिक्षक खिमेश बढिये यांच्या संकल्पने तून करण्यात आले. यावेळी ३२ विद्यार्थ्यांनी विविध खाद्यपदार्थांचे स्टाॅल लावले होते. विद्यार्थ्यांनी या आनंद मेळाव्याचा मनमुराद आनंद लुटला. कार्यक्रमाच्या आयोजनासाठी खिमेश बढिये, आत्माराम बावनकुळे, भिमराव शिंदेमेश्राम, अमित मेंघरे, किशोर जिभकाटे, चित्रलेखा धानफोले, प्रिती सेंगर, शारदा चकोले, पूजा धांडे, खुशबू नायक, मनिषा बारसागडे यांनी सहकार्य केले.