Published On : Tue, Jan 1st, 2019

रेल्वे स्थानकाची कसून तपासणी

Advertisement

सीसीटिव्ही कक्षातून हालचालिंवर लक्ष

नागपुर :नागपूर वर्षाला निरोप आणि नवीन वर्षाचे स्वागत करीत असताना असामाजिक तत्वांकडून अनुचित प्रकार घडू नये यासाठी आरपीएफने विशेष खबरदारी घेत सोमवारी रेल्वे स्थानकाची कसून तपासणी केली. याशिवाय सीसीटिव्हीच्या माध्यमातून संपूर्ण रेल्वे स्थानकावर लक्ष ठेवले.

उपराजधानीतील रस्त्यावर मद्यपी आणि हुल्लळबाजी करणाºया वाहनचालकांवर शहर पोलिस लक्ष ठेवून आहेत. त्याच प्रमाणे रेल्वे गाड्यात आणि रेल्वे स्थानकपरिसरातही अशी शक्यता लक्षात घेता मध्य रेल्वेचे वरिष्ठ विभागीय सुरक्षा आयुक्त ज्योतीकुमार सतीजा यांनी सोमवारी दिवसभर कसून तपासणी करण्याचे आदेश दिले. नागपूर रेल्वे स्थानक संवेदनशील यादीत येतो. त्यामुळे नववर्षाच्या पार्श्वभूमीवर कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी आरपीएफने विशेष खबरदारी घेतली. रेल्वे स्थानकाच्या प्रत्येक कानाकोपºयात लक्ष ठेवण्यासाठी जवानांना तैनात करण्यात आले होते.

याशिवाय ज्योतीकुमार सतीजा यांनी दिवसभर सीसीटीव्ही कक्षात तळ ठोकला. सुरक्षेच्या बाबतीत महत्त्वाच्या सूचना त्यांनी अधिकाºयांना दिल्या. रेल्वे स्थानकावरील गर्दीत असामाजिक तत्त्व आढळल्यास त्याची सूचना देण्याचे आवाहन रेल्वे स्थानकावरील व्हेंडर, कर्मचाºयांना करण्यात आले. नववर्षाच्या पहिल्या दिवशीही असाच चोख बंदोबस्त राहणार असल्याची माहिती ज्योतीकुमार सतीजा यांनी दिली.

रेल्वे स्थानकावर कुली सर्वच फलाटावर ये-जा करतात. त्यांना स्थानकावरील साºयांचीच ओळख आहे. त्यामुळे एखादा संशयित व्यक्ती दिसला की ते लगेच ओळखू शकतात. यासाठी वरिष्ठ विभागीय सुरक्षा आयुक्त ज्योतीकुमार सतीजा यांनी ‘आरपीएफ रेल सहायक नागपूर सीआर’ नावाचा व्हॉटस्अ‍ॅप ग्रुप तयार केला आहे. एखाद्या कुलीला संशयित व्यक्ती आढळल्यास तो संबंधित व्यक्तीची माहिती या ग्रुपवर देईल. यामुळे असामाजिक तत्त्वांचा बंदोबस्त करण्यास मदत होणार आहे.