| | Contact: 8407908145 |
  Published On : Fri, Sep 6th, 2019

  मनपा आयुक्तांची विसर्जन स्थळांना भेट

  स्वयंसेवी संस्थांच्या प्रतिनिधींसोबत साधला संवाद

  नागपूर: गणेशोत्सवाच्या दरम्यान घरगुती गणेश मूर्तीच्या विसर्जनासाठी नागपूर महानगरपालिकेने व्यवस्था बघण्यासाठी, त्याचे अवलोकन करण्यासाठी मनपा आयुक्त अभिजीत बांगर यांनी फुटाळा तलाव आणि अन्य ठिकाणी भेट दिली. यावेळी त्यांनी विसर्जन स्थळी भक्तांना मार्गदर्शन करण्यासाठी आणि कृत्रिम तलावातच मूर्तींचे विसर्जन करावे असे आवाहन आणि विनंती करण्यासाठी असलेल्या स्वयंसेवी संस्थांच्या प्रतिनिधींसोबत चर्चा केली.

  मनपा आयुक्त अभिजीत बांगर यांच्यासह अतिरिक्त आयुक्त राम जोशी उपस्थित होते. फुटाळा तलाव येथील भेटीत त्यांनी अधिकाऱ्यांकडून विसर्जन व्यवस्थेची माहिती जाणून घेतली. फुटाळा तलाव परिसरातील वायुसेना नगरच्या भागात भाविकांना विनंती करण्यासाठी उपस्थित असलेल्या ग्रीन व्हिजील फाऊंडेशन या स्वयंसेवी संस्थेच्या स्वयंसेवकांशी त्यांनी चर्चा केली. ग्रीन व्हिजीलचे संस्थापक अध्यक्ष कौस्तभ चॅटर्जी यांनी दिलेल्या माहितीनुसार, केवळ वायुसेना नगर भागात ठेवण्यात आलेल्या कृत्रिम तलावात ३ सप्टेंबर रोजी ३२० आणि ४ सप्टेंबर रोजी २२० गणेश मूर्तींचे विसर्जन करण्यात आले.

  नागरिक स्वत: यासाठी पुढाकार घेत असून तलाव स्वच्छ राहावे, ही प्रत्येकाची भावना असल्याचे श्री. चॅटर्जी यांनी मनपा आयुक्त अभिजीत बांगर यांना सांगितले.

  अभिजीत बांगर यांनी सर्व स्वयंसेवकांचे कौतुक केले आणि कृत्रिम तलावात गणेश विसर्जन आणि निर्माल्य कुंडातच निर्माल्य दान करण्याचे आवाहन यावेळी केले.

  Stay Updated : Download Our App
  Mo. 8407908145