नागपूर, : नागपूर महानगरपालिके तर्फे गुरुवारी (३ फेब्रुवारी) रोजी ७ प्रतिष्ठान विरुद्ध कारवाई करून ६० हजाराचा दंड वसूल करण्यात आला.
उपद्रव शोध पथकाने धरमपेठ झोन अंतर्गत कॅनल रोड येथील हिमांशु गोयंका यांच्या विरुध्द कचरा नाल्यालगत टाकल्यामुळे कारवाई करुन २०,०००/- चा दंड वसूल केला. तसेच माउंटरोड सदर येथील आर्या रेस्टॉरेन्ट आणि सांझा चुला बार ॲण्ड रेस्टॉरेन्ट यांच्या विरुध्द रस्त्यावर कचरा टाकण्यासाठी कारवाई करुन १५,००० चा दंड वसूल केला.
तसेच हनुमाननगर झोन अंतर्गत गणेशनगर, नंदनवन येथील एज्युकेशन हब टयुशन क्लासेस यांच्या विरुद्ध कोविड नियमांच्या उल्लंघन करण्याबद्दल कारवाई करून रु ५,००० च्या दंड वसूल केला. धंतोली झोन अंतर्गत कॉटन मार्केट येथील नारायण सेल्स यांच्या विरुद्ध कोविड नियमांच्या उल्लंघन करण्याबद्दल कारवाई करून रु ५,००० च्या दंड वसूल केला. त्याचप्रमाणे गांधीबाग झोन अंतर्गत बडकस चौक महाल येथील सत्यम गारमेन्टस यांच्याविरुद्ध रस्त्यालगत अतिक्रमण केल्याबद्दल कारवाई करुन १० हजार रुपयाचा दंड वसूल केला.
मनपा आयुक्त राधाकृष्णन बी यांच्या मार्गदर्शनात उपद्रव शोध पथक प्रमुख वीरसेन तांबे यांच्या नेतृत्वात कारवाई करण्यात आली.