काढलेल्या कामगारांना कामावर घ्या!-प्रहार कामगार संघाची मागणी!
ना.बच्चू कडू सह,मंडळाच्या अध्यक्षांना निवेदन,आंदोलनाचा इशारा!
वाडी (प्र): वाडी-एमआयडीसी स्थित महिंद्रा अँड महिंद्रा कंपनीतील कंत्राटी ६ माथाडी कामगारांना येथील कंत्राटदार याने नियमबाह्य व द्वेष भावनेतून कुठलीही पुर्वसूचना न देता अचानक कामावरून काढल्याने कामगारात एकच असंतोष पसरला आहे.या कामगारांना तातडीने कामावर घ्या अन्यथा प्रहार आपल्या स्टाईलने आंदोलन करणार असल्याचा इशारा जिल्हाध्यक्ष सतीश बुरीले व सचिव उमेश तिडके यांनी दिला असून या आशयाचे एक निवेदन प्रहार कामगार संघा च्या पदाधिकार्यांनी जिल्हा असंरक्षित माथाडी कामगार मंडळाचे सचिव श्री.मडावी यांना प्रत्यक्ष भेटून दिला.
प्रहार कामगार संघाच्या पदाधिकाऱ्यांनी दिलेल्या माहिती नुसार सदर कामगार हे मागील १५ ते २० वर्षापासून असंरक्षित माथाडी कामगार मंडळाच्या माध्यमातून येथे नौकरी करीत आहेत.परंतु येथील मुकळदम /कंत्राटदार राहुल वेळे यांनी कुठल्याही प्रकारची पूर्वसूचना न देता नियमबाह्य पद्धतीने द्वेष भावनेतून या कामगारांना कामावरून कमी केले यामुळे हे कामगार कोरोना संकटात बेरोजगार झाले असून यांच्या परिवारावर उपासमारीची वेळ आली आहे.ही बाब माथाडी मंडळाचे अध्यक्ष व कंत्राटदार /मुकळदम यांच्याकडे अनेकदा विनंती निवेदन सादर केले.
परंतू त्यांनी आजपावेतो कुठलीच दखल घेतली नसल्याचे या पदाधिकाऱ्यांनी सांगितले.त्या मुळे इतर कामगारतही रोष पसरला आहे.या संदर्भात या पदाधिकाऱयांनी पुन्हा माथाडी कामगार मंडळाचे सचिव श्री.मडावी यांना भेटून व निवेदन सादर करून कामावरून कमी केलेल्या या ६ कामगारांना तातडीने कामावर रुजू करण्याची विनंती केली अन्यथा आक्रमक पवित्रा घेत माथाडी कामगार कल्याण मंडळ कार्यालयासमोरच प्रहार कामगार संघ ठिय्या आंदोलन करणार असल्याचे या पदाधिकाऱ्यांनी निक्षून सांगितले व या संदर्भात कोणतीही विपरीत परिस्थिती उदभवल्यास सर्वस्वी जबाबदारी असंरक्षित माथाडी कामगार मंडळाची राहील असे सांगितले.तसेच या अन्यायाची लेखी तक्रार राज्याचे शिक्षण राज्यमंत्री व प्रहार चे प्रमुख ना.बच्चू कडू यांनाही कळविली आहे.
न्याय न मिळाल्यास आंदोलन व घेराव चा इशारा प्रहार चे युवक आघाडी जिल्हा प्रमुख अमित तायडे,महिंद्रा कम्पनी च्या प्रहार संघटनेचे अध्यक्ष राजेश तालेवार,सुभाष ठाकरे,महादेव साखरकर,जिल्हा कोशाध्यक्ष रविशंकर तितरे, लोकेश बोहरे,भाऊसर बोदरे,दीपक वाघाडे,मुरलीधर कंगाले,हेमंत बढेकर,राजू उईके,वसंत जाणे इ.नि दिला आहे.