Advertisement
मुंबई : प्रायोगिक व व्यावसायिक रंगभूमीवर लीलया मुशाफिरी करणारे आणि मराठी रंगभूमीवर अजरामर ठरलेल्या ‘मोरुची मावशी’ नाटकाचे दिग्दर्शक ज्येष्ठ रंगकर्मी दिलीप कोल्हटकर यांच्या निधनाने रंगभूमीवर मुशाफिरी करणारा दिग्दर्शक गमावला असल्याची भावना सांस्कृतिक कार्यमंत्री विनोद तावडे यांनी व्यक्त केली.
श्री. तावडे आपल्या शोकसंदेशात म्हणतात, करड्या शिस्तीचे दिग्दर्शक म्हणून अभिनेते आणि दिग्दर्शक असलेल्या श्री. कोल्हटकर यांनी मराठी रंगभूमीवर स्वत:चा वेगळा ठसा उमटविला होता. प्रायोगिक व व्यावसायिक रंगभूमीवर मुशाफिरी करत त्यांनी अनेक लोकप्रिय नाटकांचे दिग्दर्शन केले. त्यांच्या निधनामुळे मराठी रंगभूमी ज्येष्ठ आणि प्रतिभावंत रंगकर्मीला कायमचा मुकला आहे.