Published On : Sat, Mar 23rd, 2019

चंद्रपूरातून विनायक बागडे रिंगणात

Advertisement

नवी दिल्ली: येत्या लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेसच्यावतीने शुक्रवारच्या रात्रीला उमेदवारांची सातवी यादी प्रसिद्ध करण्यात आली. सातव्या यादीत एकूण 35 उमेदवारांचा समावेश आहे.या जाहीर करण्यात आलेल्या उमेदवारांमध्ये महाराष्ट्रातील एकूण पाच मतदारसंघातील उमेदवारांच्या नावांची घोषणा झाली आहे. तसेच या यादीत छत्तीसगडमधील चार, जम्मू काश्मीरमधील तीन, ओदिशामधील दोन, तामिळनाडूमधील आठ, तेलंगाणामधील एक, त्रिपुरामधील दोन, उत्तर प्रदेशमधील नऊ आणि पुदुच्चेरीमधील एका उमेदवाराचा समावेश आहे.

काँग्रेसच्या आजच्या यादीमध्ये चंद्रपूर, जालना, औरंगाबाद, भिवंडी आणि लातूर येथील उमेदवारांची घोषणा करण्यात आली. चंद्रपूर येथून विनायक बांगडे यांना उमेदवारी देण्यात आली आहे, तर जालन्यामधून विलास औताडे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. त्यांचा सामना भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्याशी होईल.

Advertisement

औरंगाबादमधून सुभाष झांबड यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाले आहे. तर भिवंडीमधून माजी खासदार सुरेश टावरे यांना पुन्हा संधी देण्यात आली आहे. तसेच आरक्षित मतदारसंघ असलेल्या लातूर येथून मच्छिंद्रनाथ कामंत यांना उमेदवारी देण्यात आली आहे.

आजच्या यादीत काँग्रेसने उत्तर प्रदेशचे प्रदेशाध्यक्ष राज बब्बर यांना फतेहपूर सिकरी येथून उमेदवारी घोषित करण्यात आली आहे. तर रेणुका चौधरी या तेलंगाणामधील खम्मम मतदारसंघातून निवडणूक लढवणार आहेत.

Advertisement

Advertisement
Advertisement
 

Advertisement
Advertisement
Advertisement
Advertisement
Advertisement