Published On : Tue, Sep 24th, 2019

भिलगावात भूमिगत गटार योजनेच्या उघड्या नालीने ग्रामस्थांची वाढली डोकेदुखी

कामठी :-एकीकडे शासनाच्या वतीने स्वच्छता हीच सेवा या अभिनव उपक्रमाचा कामठी तालुक्यात मोठ्या प्रमाणात गाजावाजा करण्यात येत आहे तर दुसरीकडे सुरू असलेल्या व्हायरल फिव्हर च्या साथीमुळे नागरिकांची रुग्णालयात मोठ्या प्रमाणात धाव घेत असल्याने ग्रामपंचायत च्या वतीने खबरदारी घेण्यात येत आहे मात्र येथिल भिलगाव ग्रामपंचायत च्या वतीने सुरू असलेल्या मनमानी कारभारामुळे वॉर्ड क्र 2 येथील राधाकृष्ण सोसायटी रहिवासी नागरिकांची डोकेदुखी वाढली असून खुद्द ग्रामपंचायत प्रशासनाच्या वतीने समस्यांचे निराकरण न करता उलट ग्रामस्थांशी वाद घालीत असल्याने दाद मागावी तरी कुणाकडे?असा प्रश्न उभा होऊन ठाकला आहे.

कामठी तालुक्यातील भिलगाव गावात विविध धर्मीय नागरिक वास्तव्यास असून गावात खेळी मेळीचे वातावरण असून बहुधा सोसायटी व कॉलोणीत गर्भश्रीमंत नागरिकांची वस्ती आहे मात्र इतक्या महागड्या गावात घामाच्या पैस्यातून सुरक्षित अशी निवासाची सोय करून घेतली मात्र ग्रामपंचायत प्रशासनाच्या वतीने सोयी सुविधा उपल्ब्ध करून देत नसल्याने नागरिकांना तेथिल असुविधेचा सामना करावा लागत असून ही असुविधा नागरिकासाठी डोकेदुःखी ठरत आहे.

वार्ड क्र 2 येथील राधाकृष्ण सोसायटी च्या समोरून मागिल चाळीस दिवसापासून भूमिगत गटार योजनेसाठी मोठे खड्डे असलेले नाल्या खोदकाम केल्या आहेत तर नुकत्याच झालेल्या सततच्या पावसामुळे या खड्ड्यात पावसाचे पाणी साचले असून खड्डे हे तुडुंब भरले आहे परिणामी या साचलेल्या पाण्यातून नागरिकांचे सांडपाणी सुद्धा यामध्ये समावेश होत असल्याने परिसरात दुर्गंधीचा वास पसरत आहे ज्यामुळे परिसरात साथरोग पसरण्याची शक्यता नाकारता येत नाही तेव्हा या साथरोगापासून मुक्तता मिळावी यासाठी ग्रामपंचायत प्रशासनाच्या वतीने खोदलेल्या खड्ड्यातून भूमिगत गटार लाईन घालुन कामे पुर्ण करण्यात यावे या मागणीसाठी ग्रा प प्रशासनाशी संपर्क साधला असता राधाकृष्ण सोसायटी वासीयांना समाधान कारक उत्तर न देता उडवाउडवीची उत्तरे देत असल्याने येथील राधाकृष्ण सोसायटी वासीयांच्या वतीने ग्रामपंचायत प्रशासनाशी विषयी रोष व्यक्त करीत नागरिकांच्या आरोग्याशी खेळ खेळण्याची परवानगी दिली कुणी ?असा प्रश्न भिलगाव चे सामाजिक कार्यकर्ते निखिल फलके , स्थानिक महिलां मंडळी शुभांगी खोडे, सुकेशनी वासनिक, अनामिका झा, देऊलकर, सविता चांदूरकर, विमल नवाडे, पद्मिनी भंडारे, धनेशवरी पाटिल, जोती गायकवाड, मीनाक्षी लाजेंवार, सोनु पराते यांनी केला आहे .

संदीप कांबळे कामठी