Published On : Fri, Aug 23rd, 2019

ग्रामसेवकांचे काम बंद आंदोलन

Advertisement

ग्रामसेवकानी ग्रामपंचायतच्या चाव्या व शिक्के केल्या बीडीओ कडे सुपूर्द

कामठी :-महाराष्ट्र राज्य ग्रामसेवक युनियन च्या वतीने प्रलंबित विविध न्यायिक मागण्यासाठी कामठी तालुका शाखेच्या वतीने काल 22 ऑगस्ट पासून ग्रामसेवकांनी काम बंद आंदोलनास सुरूवात करण्यात आली आहे.या पाश्वरभूमीवर तालुक्यातील समस्त ग्रामसेवकांनी ग्रामपंचायतच्या कार्यालयाच्या चाव्या तसेच शिक्के बीडीओ सचिन सूर्यवंशी यांच्याकडे सुपूर्द केले.

ग्रामसेवकांच्या विविध मागण्यामध्ये ग्रामसेवक व ग्रामविकास अधिकारी पद रद्द करण्यात येऊन फक्त पंचायत विकास अधिकारी पद निर्माण करणे, ग्रामसेवक संवर्गस प्रवास भत्ता शासन निर्णयाप्रमाणे मंजूर करणे, ग्रामसेवक शैक्षणीक अहर्ता बदल करून पदविधर ग्रामसेवक नेमणुका होणेबाबत, सन 2011 च्या लोकसंख्येवर आधारित राज्यभर ग्रामविकास अधिकारी साजे व पदे वाढ करणे, ग्रामसेवक ग्रामविकास अधिकारी वेतन त्रुटी दूर होणे, सन 2005 नंतरचे ग्रामसेवक यांना जुनी पेन्शन लागू करणे, आदर्श ग्रामसेवक राज्य, जिल्हास्तर, आगाऊ वेतनवाढ करून एक गाव एक ग्रामसेवक निर्मिती करणे, ग्रामसेवकाकडे अतिरिक्त कामे करणे, आदी मागण्यासाठी 22 ऑगस्ट पासून कामठी पंचायत समोर एक दिवसीय धरणे आंदोलन करून कामबंद आंदोलनास सुरुवात करण्यात आली आहे.

याप्रसंगी कामठी तालुका ग्रामसेवक युनियन चे एम के राठोड, ए व्हो कोहळे, यु एस झेलगोंदे, पी एम गावंडे, आर एस पागोटे, एन जी पठाडे, अशोक कुडमेथे, आर डोरले, ए जी तांदुळकर, आर लांजेवार, स्नेहा ठाकरे, बी डी खडसे, संदीप वंजारी, एस के गुरणले, ए एल बोंद्रे, टिकले, पंकज वाढरे, पी डागट, श्रद्धा सपाटे, प्रियांका बोरकर, वीरेंद्र ठवरे, ए एन सोरते, जी एस उईके आदी उपस्थित होते

संदीप कांबळे कामठी