कामठी :-कामठी नगर परोषद हद्दीत येणाऱ्या प्रभाग क्र 14 येथील यादव नगर परिसरात अस्वच्छता आणि घाण पसरल्याने डासांच्या संख्येत वाढ होऊन विविध साथीचे आजार जडत आहेत
तसेच या डासांच्या प्रकोपाने परिसरात डेंग्यू चा प्रकोप वाढल्याने अनेक साथीच्या रोगाची लागण झाली यातच यादव नगर रहिवासी एका शेतकऱ्याला डेंग्यू च्या रोगाची लागण झाली असता दोन दिवसांपूर्वी येथील एका खाजगी रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले मात्र काल रात्री साडे अकरा दरम्यान डेंगूसदृश आजाराने ग्रस्त शेतकऱ्याचा मृत्यू झाला असून मृतक शेतकऱ्याचे नाव मानसिंग (पहेलवान)महादेव यादव वय 50 वर्षे रा यादव नगर कामठी असे आहे.
या मृतक शेतकऱ्याच्या पार्थिवावर आज सकाळी साडे अकरा वाजता कन्हान येथील शांतीघाट मोक्षधाम येथे अंत्यसंस्कार करण्यात आले असून यांच्या पाठीमागे पत्नी, 2 मुले , एक मुलगी असा बराच मोठा आप्तपरिवार आहे मात्र या दुःखद घटनेने नगर परिषद च्या आरोग्य प्रशासनाविरोधात नाराजगीचा सूर वाहत होता
संदीप कांबळे कामठी