Published On : Fri, Jul 10th, 2026
By Nagpur Today Nagpur News

विधानभवनाच्या जेवणात माशी; आमदार विकास ठाकरे यांनी विधानसभेत उपस्थित केला गंभीर मुद्दा

Advertisement

मुंबई : पावसाळी अधिवेशनादरम्यान विधानभवनातील भोजन व्यवस्थेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. रिसोडचे आमदार अमित झनक यांच्या जेवणात माशी आढळल्याचा मुद्दा पश्चिम नागपूरचे आमदार विकास ठाकरे यांनी विधानसभेत उपस्थित करत सरकारचे लक्ष वेधले. या घटनेमुळे विधानभवनातील अन्नाच्या दर्जाबाबत आणि स्वच्छतेबाबत प्रश्न उपस्थित झाले आहेत.

सभागृहात बोलताना विकास ठाकरे यांनी सरकारवर टीका करत म्हटले की, राज्याच्या जनतेचे प्रतिनिधित्व करणाऱ्या आमदारांनाच सुरक्षित आणि दर्जेदार भोजन मिळत नसेल, तर सामान्य नागरिकांच्या अन्नसुरक्षेची हमी सरकार कशी देणार? ही केवळ एका आमदाराच्या जेवणाची बाब नसून, अन्न सुरक्षा व्यवस्थेतील त्रुटी अधोरेखित करणारी घटना असल्याचे त्यांनी सांगितले.

या प्रकरणाची गंभीर दखल घेत विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी तातडीने चौकशी करण्याचे निर्देश दिले. तसेच विधानभवनातील भोजन व्यवस्थेची सखोल तपासणी करून आवश्यक सुधारणा करण्यात येतील, असे आश्वासन त्यांनी सभागृहात दिले.

या घटनेनंतर विधानभवनातील कँटीनच्या स्वच्छता, अन्नाची गुणवत्ता आणि देखरेख याबाबत नव्याने चर्चा सुरू झाली असून, चौकशी अहवालानंतर पुढील कारवाईकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Advertisement
Advertisement
GET YOUR OWN WEBSITE
FOR ₹9,999
Domain & Hosting FREE for 1 Year
No Hidden Charges
Follow Nagpur Today on Google
Add Nagpur Today to your Preferred Sources on Google to see our latest news more prominently in Search.