Published On : Tue, Aug 25th, 2020

विजयराव मुडे तळमळीने काम करणारा कार्यकर्ता : नितीन गडकरी

स्व. विजयराव मुडे यांना श्रध्दांजली

नागपूर: खासदार स्व. विजयराव मुडे यांनी सातत्याने परिश्रम करून पक्षाचा वर्ध्यात विस्तार केला. शिक्षकांच्या समस्यांप्रमाणेच शेतकर्‍यांच्या प्रश्नासाठी तळमळीने काम करणारा हा कार्यकर्ता होता. भाजपाच्या विचारावर श्रध्दा ठेवणारा कार्यकर्ता, हे विविध पैलू त्यांच्या जीवनाचे आहेत, असे विचार केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक, परिवहन व सूक्ष्म, मध्यम व लघु उद्योग मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केले.

Advertisement

व्हिडिओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून ना. गडकरी श्रध्दांजली सभेत आपल्या भावना व्यक्त करीत होते. वर्धा येथे ही सभा झाली. या सभेला माजी मुख्यमंत्री व विद्यमान विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस, खा. रामदास तडस, आ. सुधीर मुनगंटीवार, वर्धा जिल्ह्याचे माजी पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, आ. दादाराव केेचे, आ. समीर कुणावार, आ. रामदास आंबटकर, आ. अनिल सोले, संघटनमंत्री डॉ. श्रीकांत कोठेकर आदी उपस्थित होते.

याप्रसंगी आपल्या भावना व्यक्त करताना ना. गडकरी म्हणाले- विजयराव शिक्षक परिषदेचे काम करीत होते. त्या काळापासून त्यांचा माझा जवळचा संबंध होता. विधान परिषदेत ते माझे सहकारीही होते. त्या काळात वर्धा जिल्ह्यात काम करणे म्हणजे दगडावर डोके आपटण्यासारखे होते. प्रतिकूल काळ, मानसन्मान नाही, जनसमर्थन नाही अशा स्थितीत पक्षाने विजयरावांना खासदार म्हणून लढवायचे ठरवले आणि ते विजयीही झाले, असेही ते म्हणाले.

विजयरावांची आमदार आणि खासदार म्हणून कारकीर्द आपण पाहिली असल्याचे सांगून ना. गडकरी म्हणाले- त्या काळात कार्यकर्त्यांनी अतिकष्ट घेतले. नवीन कार्यकर्त्यांना याची कल्पना नाही. विजयरावांचा अकाली मृत्यू धक्कादायक आहे. प्रतिकूल काळात आपला पक्ष आणि विचारधारा टिकविण्यासाठी अनेक वेदना त्यांना सहन कराव्या लागल्या. आपले जीवन पक्षासाठी दिले याची जाणीव आपण ठेवली पाहिजे. पक्षाचा एक महत्त्वाचा पिलर ढासळला अशा भावना व्यक्त करून ना. गडकरी यांनी त्यांना श्रध्दांजली अर्पण केली.

Advertisement
Advertisement
Advertisement
Advertisement
Advertisement
Advertisement

Advertisement
Advertisement

 

Advertisement
Advertisement
Advertisement