Published On : Tue, Jun 9th, 2026
By Nagpur Today Nagpur News

‘जिसकी जितनी संख्या भारी, उसकी…;ओबीसींच्या स्वतंत्र जनगणनेसाठी विजय वडेट्टीवार आक्रमक

Advertisement

नागपूर – देशभरात राष्ट्रीय जनगणना प्रक्रियेला सुरुवात होत असताना ओबीसींसाठी स्वतंत्र वर्गवारी नसल्याच्या मुद्द्यावरून काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी केंद्र सरकारवर टीकेची झोड उठवली आहे. ओबीसींची स्वतंत्र जनगणना करण्यात यावी, या मागणीसाठी पूर्व विदर्भात मोठे आंदोलन उभारण्याचा इशाराही त्यांनी दिला.

भंडारा जिल्ह्यात जनगणना प्रक्रियेवर बहिष्कार टाकल्याची माहिती देताना वडेट्टीवार म्हणाले की, केंद्र सरकारने ओबीसी समाजाशी विश्वासघात केला आहे. पंतप्रधानांनी यापूर्वी दिलेल्या आश्वासनानुसार जनगणनेत ओबीसींसाठी स्वतंत्र रकाना असणे आवश्यक होते. मात्र तसे न झाल्याने ओबीसी समाजात नाराजी वाढली आहे.

Gold Rate
Sept 17,2026 - Time 10.30Hrs
Gold 24 KT ₹ 1 51,500 /-
Gold 22 KT ₹ 1,40,500 /-
Silver/Kg ₹ 2,29,500/-
Platinum ₹ 88,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

सरकार ओबीसी जनगणनेपासून का दूर पळत आहे, असा सवाल उपस्थित करत वडेट्टीवार यांनी लोकसंख्येच्या प्रमाणात हक्क आणि प्रतिनिधित्व मिळणे आवश्यक असल्याचे मत व्यक्त केले. अर्थसंकल्पातील तरतुदी, शिष्यवृत्ती, शासकीय योजना आणि इतर सुविधांमध्ये ओबीसींना त्यांच्या लोकसंख्येनुसार वाटा मिळावा, अशी मागणी त्यांनी केली. यावेळी त्यांनी “जिसकी जितनी संख्या भारी, उसकी उतनी भागीदारी” हा नारा पुन्हा एकदा दिला.

गुन्हे दाखल झाले तरी मागे हटणार नाही-

Advertisement

जनगणनेत सहकार्य न केल्यास कायदेशीर कारवाई होऊ शकते, या प्रश्नावर वडेट्टीवार यांनी कठोर भूमिका घेतली. सरकारने ओबीसींसाठी स्वतंत्र रकाना समाविष्ट केल्यास आम्ही पूर्ण सहकार्य करू. मात्र मागण्यांकडे दुर्लक्ष करून कारवाईचा मार्ग स्वीकारला तर ओबीसी समाज जेलभरो आंदोलनासाठीही तयार असल्याचा इशारा त्यांनी दिला.

मोदी सरकारवरही साधला निशाणा-

यावेळी विजय वडेट्टीवार यांनी केंद्र सरकारच्या १२ वर्षांच्या कार्यकाळावरही टीका केली. देशाच्या आर्थिक आणि सामाजिक परिस्थितीबाबत चिंता व्यक्त करत त्यांनी सध्याच्या परिस्थितीची तुलना देशाच्या स्वातंत्र्योत्तर काळाशी करता येणार नसल्याचे म्हटले. तसेच जनतेसमोरील विविध समस्यांवरून केंद्र सरकारवर निशाणा साधत त्यांनी आपल्या भूमिकेचा पुनरुच्चार केला.

ओबीसी जनगणनेच्या मुद्द्यावरून राज्यातील राजकीय वातावरण तापण्याची चिन्हे असून, वडेट्टीवार यांच्या आंदोलनाच्या इशाऱ्याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.

Advertisement
GET YOUR OWN WEBSITE
FOR ₹9,999
Domain & Hosting FREE for 1 Year
No Hidden Charges

Follow Nagpur Today on Google
Add Nagpur Today to your Preferred Sources on Google to see our latest news more prominently in Search.