Published On : Tue, Jun 9th, 2026
By Nagpur Today Nagpur News

NEET आणि पेपरफुटी प्रकरणावरून ‘कॉकरोच जनता पार्टी’ आक्रमक; ११ जूनला पुणे विद्यापीठात आंदोलनाची घोषणा

Advertisement

पुणे – नीट (NEET) आणि विविध स्पर्धा परीक्षांमधील कथित गैरव्यवहार तसेच पेपरफुटीच्या घटनांविरोधात ‘कॉकरोच जनता पार्टी’ (CJP) आता महाराष्ट्रात आंदोलनाची धार वाढवणार आहे. पक्षाचे संस्थापक अभिजीत दीपके यांनी ११ जून रोजी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात विद्यार्थ्यांचे मोठे आंदोलन आयोजित करण्यात येणार असल्याची घोषणा केली आहे.

जंतर-मंतरवरील आंदोलनानंतर अभिजीत दीपके नुकतेच संभाजीनगर येथील आपल्या गावी परतले आहेत. त्यानंतर त्यांनी सीजेपीच्या अधिकृत सोशल मीडिया खात्यांद्वारे पुढील आंदोलनाची रूपरेषा जाहीर केली. यावेळी त्यांनी विद्यार्थ्यांना एकत्र येण्याचे आवाहन करत पुण्यात मोठ्या प्रमाणावर निदर्शने करण्याचा निर्धार व्यक्त केला आहे.

Gold Rate
Sept 17,2026 - Time 10.30Hrs
Gold 24 KT ₹ 1 51,500 /-
Gold 22 KT ₹ 1,40,500 /-
Silver/Kg ₹ 2,29,500/-
Platinum ₹ 88,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

दीपके यांनी प्रसिद्ध केलेल्या व्हिडिओ संदेशानुसार, गुरुवारी ११ जून रोजी दुपारी ४ वाजता सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ परिसरात आंदोलन करण्यात येणार आहे. केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून राजीनामा द्यावा, ही आंदोलनकर्त्यांची प्रमुख मागणी असणार आहे.

यासंदर्भात बोलताना दीपके यांनी केंद्र सरकारला इशाराही दिला आहे. जंतर-मंतरवरील आंदोलनातून शिक्षणमंत्र्यांना राजीनाम्यासाठी दिलेली मुदत संपल्यानंतरही निर्णय न झाल्यास देशभरातील विद्यार्थ्यांना संघटित करून विविध राज्यांत आंदोलन छेडले जाईल, असे त्यांनी म्हटले आहे. तसेच गरज पडल्यास पुन्हा एकदा दिल्लीकडे मोर्चा वळवण्याचाही इशारा त्यांनी दिला.

Advertisement

सोशल मीडियावर आंदोलनाची माहिती शेअर करताना दीपके यांनी “पुण्यात भेटू, महाराष्ट्र जिंदाबाद” असा संदेश दिला आहे. तर सीजेपीच्या अधिकृत पोस्टरमधून पुण्यातील विद्यार्थ्यांना या आंदोलनात सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

नीट, सीबीएसई आणि इतर स्पर्धा परीक्षांशी संबंधित वादांच्या पार्श्वभूमीवर या आंदोलनाकडे राज्यातील विद्यार्थी आणि पालकांचे लक्ष लागले आहे.

Advertisement
GET YOUR OWN WEBSITE
FOR ₹9,999
Domain & Hosting FREE for 1 Year
No Hidden Charges

Follow Nagpur Today on Google
Add Nagpur Today to your Preferred Sources on Google to see our latest news more prominently in Search.