Published On : Mon, Mar 19th, 2018

विजय झलके यांनी स्वीकारला जलप्रदाय समिती सभापती पदाचा कार्यभार

Advertisement


नागपूर: नागपूर महानगरपालिकेचे नवनियुक्त जलप्रदाय समिती सभापती पिंटू झलके यांनी सभापती पदाची सूत्रे सोमवारी (ता.१९) स्वीकारली. यावेळी महापौर नंदा जिचकार, उपमहापौर दीपराज पार्डीकर, सत्तापक्ष नेते संदीप जोशी यांनी त्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.

यावेळी माजी आमदार मोहन मते, समिती सदस्य दीपक वाडीभस्मे, प्रदीप पोहाणे, जयश्री रारोकर, प्रणिता शहाणे, प्रतोद दिव्या धुरडे, परिवहन समिती सभापती बंटी कुकडे, स्थापत्य व प्रकल्प समिती सभापती संजय बंगाले, महिला व बालकल्याण समिती सभापती प्रगती पाटील, दुर्बल घटक समिती सभापती महेंद्र धनविजय, मंगला खेकरे, राजेश घोडपागे, भारती बुंडे, सुनील हिरणवार, उषा पॅलट, अमर बागडे, नेहा वाघमारे, भारती बुंडे, स्वाती आखतकर, वंदना यंगटवार, भगवान मेंढे, स्नेहल बिहारे, क्रीडा समिती उपसभापती प्रमोद तभाने उपस्थित होते.

यावेळी नवनिर्वाचित सभापती पिंटू झलके यांचे महापौर नंदा जिचकार यांनी शाल, श्रीफळ, देऊन सत्कार केला. यावेळी बोलताना पिंटू झलके म्हणाले, सहकाऱ्यांच्या समन्वयातून कार्य करेन.. पक्षाने माझ्यावर टाकलेल्या विश्वासाला कुठेही तडा जाणार नाही, याची ग्वाही त्यांनी यावेळी दिली.

Gold Rate
15 May 2025
Gold 24 KT 92,100/-
Gold 22 KT 85,700/-
Silver/Kg 94,800/-
Platinum 44,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

महापौर नंदा जिचकार याप्रसंगी बोलताना म्हणाल्या, विजय झलके यांनी आज पदभार स्वीकारला याबद्दल मी त्यांचे अभिनंदन करते. आम्ही त्यांच्यावर सोपविलेली जबाबदारी ते समर्थपणे सांभाळतील, असा विश्वास त्यांनी यावेळी बोलताना व्यक्त केला. कार्यक्रमाचे संचालन व आभार जनसंपर्क अधिकारी अशोक कोल्हटकर यांनी केले.

Advertisement
Advertisement
Advertisement