Published On : Tue, Jul 21st, 2020

विद्यासागर कला महाविद्यालयात बी .ए .प्रथम वर्षाची प्रवेश प्रक्रिया सुरू

विद्यासागर कला महाविद्यालय , खैरी ( बि.) रामटेक येथे बी .ए. प्रथम वर्षाची ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया सुरू झालेली आहे. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या सूचनेनुसार सत्र 2020 – 21 साठी नवीन नियमावली तयार करण्यात आलेली असून त्यानुसार विद्यापीठाने बी .ए. प्रथम वर्षाच्या प्रवेशाचे विद्यार्थ्यांसाठी व महाविद्यालयासाठी वेळापत्रक तयार करून त्यानुसार विद्यार्थ्यांना महाविद्यालयात प्रवेश घ्यायचा आहे.

दिनांक 17 जुलै पासून विद्यार्थ्यांना प्रवेशअर्ज प्राप्त होणार असून महाविद्यालयाच्या प्रवेशासाठी प्रवेश अर्ज सादर करण्यापूर्वी विद्यापीठाच्या rtmnu.university या वेब पोर्टलवर दिनांक 17 जुलै पासून दिनांक 12 ऑगस्ट पर्यंत नोंदणी करता येईल. विद्यापीठ नोंदणीकरिता दहावी आणि बारावीच्या गुणपत्रिकेचे स्कॅन करून कॉपी अपलोड करायची आहे .

विद्यार्थ्यांना नोंदणीसाठी कोणत्याही प्रकारची अडचण होता कामा नये म्हणून विद्यासागर कला महाविद्यालयात च विद्यापीठ ऑनलाईन नोंदणीची व्यवस्था करण्यात आली असून विद्यार्थ्यांनी सकाळी 10.30 ते दुपारी 3.00 वाजतापर्यंत महाविद्यालयात संपर्क साधावा.

9834449045 ,9766124561, 9960275503 या क्रमांकावर विद्यार्थ्यांनी संपर्क साधावा.