Published On : Mon, Feb 10th, 2020

विद्यासागर कला महाविद्यालयात कौशल्य विकास अभ्यासक्रमाचे उद्घाटन

Advertisement

रामटेक -विद्यासागर कला महाविद्यालयात कौशल्य विकास अभ्यासक्रमांचे उदघाटन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. पिल्लई यांचे हस्ते संपन्न झाले. महाविद्यालयाच्या सभागृहात आयोजित करण्यात आलेल्या या सोहळ्यात 5 लघु कालावधी प्रमाणपत्र अभ्यासक्रमांचे उदघाटन करण्यात आले. यात फॅशन डिझाईन, बेसिक ग्रामर आणि कौशल्य, योगा आणि मेंटल हेल्थ, ट्रॅव्हल आणि टुरिझम, सृजनात्मक लेखन आणि संप्रेषण कौशल्य या 5 लघु कालावधी अभ्यासक्रमाचा समावेश आहे.

विद्यार्थ्यांनी केवळ महाविद्यालयीन अभ्यासक्रमावर विसंबून न राहता वेगवेगळ्या ठिकाणी अर्थार्जनासाठी वेगवेगळ्या प्रकारच्या अभ्यासक्रमांची उपयुक्तता जाणून घेतली पाहिजे व भविष्यातमध्ये त्याला अर्थजनाचे साधन बनविले पाहिजे असे डॉ पिल्लई यांनी उदघाटन करताना मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे प्रस्तावित अभ्याक्रमांचे संयोजक डॉ . आशिश ठाणेकर यांनी केले.

या प्रसंगी सर्व अभ्यासक्रमांचे संयोजक डॉ गिरीश सपाटे, प्रा. अनिल दाणी, डॉ. ज्योती कवठे, प्रा. रवींद्र पानतावणे, डॉ. सतीश महल्ले प्रामुख्याने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कु. प्रीती माहुरकर हिने केले. आभार प्रकाश मर्सकोल्हे यांनी केले.