Published On : Mon, Feb 10th, 2020

हिंगणघाटमधील घटना महाराष्ट्राच्या मातीला लाजिरवाणी घटना – अजित पवार

हिंगणघाटमधील त्या बहिणीला वाहिली अजितदादांनी श्रद्धांजली…

मुंबई -हिंगणघाटमधल्या बहिणीला नराधमाच्या हल्ल्यातून आणि नंतर मृत्यूमधून आपण वाचवू शकलो नाही ही महाराष्ट्राच्या मातीसाठी लाजीरवाणी घटना आहे अशा शब्दात आपला संताप राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी व्यक्त केला आहे.

Gold Rate
24 Sept 2025
Gold 24 KT ₹ 1,14,000 /-
Gold 22 KT ₹ 1,06,000 /-
Silver/Kg ₹ 1,35,700/-
Platinum ₹ 49,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

हिंगणघाट मधील बहिणीचे निधन झाल्यावर तिला श्रध्दांजली वाहताना अजितदादा पवार यांनी यापुढे कठोर पावले उचलण्याचे संकेत दिले आहेत.

अशा घटनांची पुनरावृत्ती होऊ न देण्यासाठी सरकार यापुढे अधिक संवेदनशील व गुन्हेगारांच्या विरोधात कठोरपणे काम करेल. समाजानेही महिलांच्या सन्मानाप्रती जागरूक राहिलं पाहिजे असेही अजितदादा पवार म्हणाले.

हिंगणघाट घटनेतील आरोपीला त्याच्या गुन्ह्याची शिक्षा लवकरच मिळेल आणि ती इतरांवर जरब बसवणारी असेल असे स्पष्ट संकेत अजितदादा पवार यांनी दिले आहेत.

आपल्या घरात असा नराधम निर्माण होऊ न देणे हीच हिंगणघाट हल्ल्यातील मृत बहिणीला आपली आदरांजली असेल. मी तिच्या कुटुंबियांच्या आणि हिंगणघाटवासियांच्या दुःखात सहभागी आहे अशा शब्दात आपला शोक व्यक्त करत आदरांजली वाहिली आहे.

Advertisement
Advertisement