Published On : Sat, Jul 27th, 2019

विद्यासागर कला महाविद्यालयात भव्य वृक्षारोपण कार्यक्रम संपन्न

रामटेक :विद्यासागर कला महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना तसेच नेचर क्लब यांच्या संयुक्त विद्यमाने भव्य वृक्षारोपण कार्यक्रममाचे आयोजन करण्यात आले. महाराष्ट्र शासनाने 33 कोटी झाडे लावण्याचे उद्दिष्ट ठेवलेले असून प्रत्येक शहरात, गावात, ग्रामपंचायत क्षेत्रात झाडे लावण्याचे कार्य मोठ्या प्रमाणात सुरु आहे.

रामटेकच्या खैरी बिजे. या ग्रामपंचायतीत कार्यरत असलेल्या विद्यासागर कला महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना व नेचर क्लब च्या सेयंसेवकांनी महाविद्यालयीन परिसरात तब्बल 200 झाडांची लागवड केली . महाविद्यालयीन परिसरात भविष्यात मोठी होणारी जंगली झाडे लावून त्यांचा सांभाळ करून त्यांना मोठे करण्याची प्रतिज्ञा सर्व स्वयंसेवक यांनी घेतली.

महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. पिल्लई यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच डॉ गिरीश सपाटे, प्रा. अनिल दाणी, प्रा. डॉ सुरेश सोमकुवर, प्रा. रवींद्र पानतावणे, डॉ. ज्योती कवठे, डॉ. सतीश महल्ले, युनूस पठाण,ज्ञानेश्वर हटवार, रफिक कुरेशी, विनोद परतेती , सर्व रासेयो स्वयसेवक यांनी या राष्ट्रीय कार्यक्रमात सहभागी होऊन वृक्षारोपण कार्यक्रमाला यशस्वी केले.