Published On : Sat, Jul 27th, 2019

साटक येथे शेतीशाळेकरिता उपयोगी साहित्य वाटप व शेतीशाळा संपन्न

कन्हान : – पारशिवनी तालुक्यातील कन्हान मंडळ अंतर्गत येणाऱ्या साटक येथे कृषी विभाग पारशिवनी व्दारे क्रॉप सॅप संलग्न शेतकऱ्यांच्या शेती शाळेचा तिसरा वर्गाात शेती शाळेकरिता उपयोगी साहित्य वाटप करून शेती शाळा थाटात संपन्न झाली.

महाराष्ट्र शासन कृषी विभागांच्या मार्गदर्शन सुचनांन्वये राज्यभर विविध पिकांच्या क्रॉप सॅप संलग्न शेतकरी शेती शाळांचे आयोजन करण्यात येत आहे. या अनुषंगाने साटक येथे धान पिकाची शेतीशाळा घेण्यात आली. सदर शेती शाळेच्या कार्यक्रमात तालुका कृषी अधिकारी पारशिवनी श्री जी बी वाघ, कृषी पर्यवेक्षक सौ एम ए थेरे, प्रमुख मार्गदर्शक व विषय तज्ञ श्री जे बी भालेराव हयानी शेतकऱ्यांना शेतीशाळे साठी उपयोगी साहित्य वाटप करून दशपर्णी अर्काचे प्रात्याक्षिक करून दाखविले व सद्याच्या दुष्काळग्रस्त परिस्थितीत करावयाच्या विविध उपाय योजना, प्रधानमंत्री पीक विमा योजना विषयी मार्गदर्शन करण्यात आले.

तसेच या दरम्यान धान पिका वरील विविध कीड व रोग व्यवस्थापन, गटचर्चा, क्षेत्रीय भेट, समूह रंजन, शेतकऱ्यांची निर्णय क्षमता कशी वाढवता येईल या विषयी चर्चात्मक मार्गदर्शन करण्यात आले आणि उपस्थित सर्वांना अल्पोपहार करून शेती शाळेचा तिसरा वर्ग कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.

याप्रसंगी प्रामुख्याने साटक च्या सरपंचा सौ सिमाताई उकुंडे, उपसरपंच गजानन वांढरे, कृषी मित्र मंगेश भुते, रविंद्र गुडधे, अमोल देशमुख, आत्माराम उकुंडे, भिमराव वाडीभस्मे, मंगेश हिगे, राजु चोपकार सह गावातील शेतकरी मोठया संख्येने उपस्थित होते. शेती शाळेच्या यशस्वीते करिता कृषी सहायक श्री के बी ठोंबरे, श्री ए जे झोड हयानी विशेष परिश्रम घेतले.