Published On : Sat, May 26th, 2018

Video: कार्यक्रम फक्त पोस्टपोन, रद्द नाही – संदीप जोशी

Sachin Tendulkar

नागपूर: निसर्गाच्या अचानक आलेल्या व्यत्ययामुळे, संपूर्ण तयारीनिशी आयोजित खासदार क्रीडा महोत्सवाच्या समारोप कार्यक्रमाला पुढे ढकलण्यात आले. या कार्यक्रमात सचिन तेंडुलकर येणार होते. पाऊस आल्याचे वृत्त कळताच त्यांचे विमान औरंगाबाद येथून परत मुंबई कडे वळवण्यात आलं. मात्र हा कार्यक्रम फक्त पुढे ढकलण्यात आला असून रद्द झाला नसल्याचे संयोजक संदीप जोशी यांनी सांगितले.

या कार्यक्रमासाठी केंद्रीय मंत्री नितिन गडकरी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ही नागपुरात आले होते. नितिन गडकरी यांच्या संकल्पनेतून साकारण्यात आलेल्या खासदार क्रीडा महोत्सवामध्ये मागील 20 दिवसांमध्ये नागपूरकरांनी अत्यंत उत्साहाने सहभाग घेतला. आयोजकांनीही खूप मेहनत घेतली. म्हणून सर्वांचे आभार मानत पावसाच्या सरींमध्येही कार्यक्रम स्थळावर निडरपने थांबलेल्या सर्व लोकांचे संदीप जोशी यांनी कौतुक केले आणि उद्या (27 मे) सकाळी 5:30 वाजता जोगर्स पार्क येथे सर्वांना वोकेथॉन साठी येण्याचे आवाहन केले.