Published On : Fri, Aug 14th, 2020

Video : रिव्हर्स रिक्षा चालवून केला सरकारचा निषेध

– नागपूर शहर सुधार समितीचे अनोखे आंदोलन

नागपूर : कोरोनामूळे सामान्य माणूस आर्थिक दृष्ट्या पुरता खचला आहे. त्यामुळे वीज, पाणी, आरोग्य, शिक्षण या मूलभूत गरजांची पूर्तता करणे सरकारचे कर्तव्य आहे. पण सरकारचे धोरण उधोगांना वाटते, गरिबांना दाटते असे आहे. सरकारच्या या उलट्या धोरणाच्या निषेधार्थ नागपूर शहर सुधार समितीने अनोखे आंदोलन केले. इ-रिक्षा उलटा चालवून सरकारच्या उलट्या धोरणाचा निषेध केला.

Gold Rate
22 Sept 2025
Gold 24 KT ₹ 1,11,200 /-
Gold 22 KT ₹ 1,03,400 /-
Silver/Kg ₹ 1,33,000/-
Platinum ₹ 48,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

मानेवाडा चौक ते तुकडोजी चौक दरम्यान गुरुवारी पन्नासहून अधिक इ-रिक्षा चालक आपल्या रिक्षा घेऊन आंदोलनात सहभागी झाले होते. या चालकांनी मानेवाडा ते तुकडोजी चौक दरम्यान रिव्हर्स वाहने चालविली. रस्त्यावर रिव्हर्स वाहने चालताना अनेकजण कुतूहलाने बघत होते. आंदोलनात महिला ई-रिक्षा चालक ही सहभागी झाल्या होत्या. कोरोनामूळे लोकांचे रोजगार हिरावले आहे.

आर्थिक संकट कोसळले असताना वीज, पाणी बिल, शाळेची फी आदींचा बोझा जनतेवर पडत आहे. याकडे सरकारचे लक्ष वेधावे म्हणून हे आंदोलन करण्यात आले. सरकारने 200 युनिट पर्यंत वीज बिल माफ करावे, पाणी, शिक्षण निशुल्क द्यावे, अशी मागणी संघटनेचे अध्यक्ष प्रवीण राऊत यांनी केली आहे.

Advertisement
Advertisement