Published On : Mon, Sep 30th, 2019

विडिओ : शेतकर्‍यांना सिंचन व्यवस्था, महिला व तरुणांना दिला रोजगार – आमदार सुनील केदार

Advertisement

नागपूर: शेतकर्‍यांच्या शेतात पाणी पहुँचले पाहिजे, यासाठी गावांमध्ये बंधारे बनवलेली आहेत. रोडांचे काम केली गेली आहेत. गेल्या वर्षी केंद्र सरकारने कळमेश्वर तहसील कोरडा दुष्काळ जाहीर केल्यानंतरही कळमेश्वर परिसरात पिण्याच्या पाण्यासाठी टँकर लावण्याची गरज पडली. कळमेश्वर आणि सावनेर मध्ये क्रीडा संकुलही बनिवलील आहे. कळमेश्वर आणि सावनेरमध्ये मुलींसाठी वसतिगृहे आणि बेरोजगार तरुणांसाठी फॅक्टरी बंद न करण्याची काळजी घेण्यात आली आहे. डब्ल्यूसीएलमध्ये केवळ स्थानिक लोकांना नोकरी देण्यावर भर देण्यात आला आणि गुमगावमधील मॅंगनीज खाणींचे आधुनिकीकरण व विस्तार करण्याचे काम ही सुरू आहे. चिन ची कंपनीला हे काम देण्यात आले आहे आणि ज्यामुळे येथे 700 ते 800 तरुणांना काम मिळेल. ही माहिती सावनेर विधानसभा मतदार संघाचे कॉंग्रेसचे आमदार सुनील केदार यांनी दिली. ते ‘नागपूर टुडे’ सोबत आपल्या क्षेत्राविषयी चर्चा करीत होते. महिलांना काम देण्याचेही प्रयत्न केले असल्याचे त्यांनी सांगितले. महिला बचत गटाच्या माध्यमातून मदत केली गेली आहे. याशिवाय महिलांना वैयक्तिकरित्या आर्थिक मदतही देण्यात आली आहे. महिलांना मदत देऊन सक्षम केले जात आहे.

महिलांना येत्या काळात अधिक सक्षम बनविण्यासाठी लिज्जत पापड, मसाले आणि कपड्यांची सिलाई ची फ्रँचायझी आणल्या जाण्यावर विचार केला जात आहे, असल्याचेही ते म्हणाले. मराठी शाळा बंद पडत आहेत यावर ते म्हणाले की, मराठी शाळा पुढे करण्यासही प्रोत्साहन दिले जात आहे. गावांच्या जिल्हा परिषदे च्या शाळा डिजिटल करणे सुरू केलेले आहे. प्रोजेक्टर आणि अन्य साधन डिजिटल बनविण्यासाठी शाळांना दिली जात आहे. परिसरातील अनेक गावांच्या शाळांमध्ये सुविधा पुरविल्या गेल्या आहेत.