Published On : Mon, Sep 30th, 2019

ब्राह्मण समाजाचा वधु-वर परिचय मेळावा २० ऑक्टोबर रोजी

नागपूर : महाराष्ट्र ब्राह्मण सभा नागपूरच्या वतीने ब्राह्मण समाजाचा वधु-वर परिचय मेळावा येत्या २० ऑक्टोबर रोजी, सकाळी १० वाजता श्री. पूज्य गोळवलकर गुरूजी (पी.एम.जी.) सभागृह, माधव नगर, माटे चौक, येथे आयोजित करण्यात आला आहे.

ब्राह्मण समाजातील विवाह इच्छुक मुला मुलींचा परिचय व्हावा या हेतूने महाराष्ट्र ब्राह्मण सभा नागपूरच्या वतीने दरवर्षी हा मेळावा आयोजित करण्यात येतो. या मेळाव्याची परिचय पुस्तिका वितरीत करण्यात येईल.

अधिक माहितीसाठी विवाह इच्छुक उपवर-वधुंनी १० ऑक्टोबर पर्यंत करूणा आचार्य, संध्या जोशी, मेधा चिटगोपेकर, प्रियंका बागडदेव, प्रेरणा जोशी, अमृता मराठे, विजया अभ्यंकर, यांच्यासी धनश्री अपार्टमेंट्स, १३,१४,१५. आनंदनगर, अत्रे-ले- आऊट, नागपूर-२२ तसेच सौ.करुणा आचार्य संयोजक महाराष्ट्र ब्राह्मण सभा मेळावा शाखा नागपूर, २९ रमेश इस्टेट, घोगली नागपूर,मो. नंबर ७७४४९-६०१६८ येथे, संपर्क साधावे असे आवाहन आयोजकानी केले आहे.