नागपूर: आ . चंद्रशेखर बावनकुळे ह्यांची पंतप्रधान मा . नरेंद्र मोदी जी यांच्याबद्दल केलेल्या राष्ट्रद्रोही विधानाबद्दल नाना पटोले ह्यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्याची मागणी .
काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी पंतप्रधान आदरणीय श्री. नरेंद्र मोदी जी यांच्याबद्दल केलेले विधान अत्यंत अवमानकारक आहे. राजकीय मतभेद असले तरी देशाच्या पंतप्रधानांबाबत असे आक्षेपार्ह विधान करणे योग्य नाही. पंतप्रधानांना मारण्याची भाषा करणे हा राष्ट्रीय सुरक्षेशी संबंधीत गंभीर मुद्दा आहे .
काही दिवसांपूर्वी मा. मोदी जी यांच्या जीविताला पंजाब मध्ये निर्माण केलेला धोका हा त्याच षडयंत्राचा भाग आहे. पटोले यांनी मा. मोदीजी यांच्याबाबत केलेले संतापजनक विधान हे त्याच कट- कारस्थानातून आले आहे असे स्पष्ट दिसते .
आ . चंद्रशेखर बावनकुळे ह्यांनी नाना पटोलेंच्या विरोधात राष्ट्रद्रोही विधानासाठी कुही , नागपूर ज़िल्हा पोलीस ठाण्यात रीतसर तक्रार नोंदवली आहे आणि तात्काळ अटक करण्याची मागणी केली आहे .
रासुका कायद्याची अंमलबजावणी करत तात्काळ नाना पटोले ह्यांना अटक करत कायदेशीर कार्यवाही न केल्यास भाजपा त्रीव्र आंदोलन करेल असा इशाराही आ . चंद्रशेखर बावनकुळे ह्यांनी दिलाय .