नागपूर : नागपूर हे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि तिसऱ्यांदा खासदार झालेले नितीन गडकरी यांचे माहेरघर आहे.मात्र याच
उत्तर नागपुरातील नागरिकांना मूलभूत सुविधांपासून वंचित राहावे लागत आहे.
नागपूर टुडेशी संवाद साधताना यशोधरानगर शिवाजी चौक येथील नागरिकांनी आपल्या समस्यांचा पाढाच वाचला. या भागात रस्त्याची अवस्था बिकट आहे. नागरिक पाणी, गडरलाईनसाख्या सुविधांपासून वंचित आहेत. निवडणुकीपूर्वी लोकप्रतिनिधी अनेक दावे करतात. परंतु निवडून आल्यानंतर ते नागरिकांच्या प्रश्नांकडे पाठ फिरवितात. हे पाहतामहानगरपालिकेने या भागातील समस्या सोडविण्याची मागणी नागरिकांनी उचलून धरली आहे.
या परिसरात स्ट्रीट लाईट नसल्यामुळे रात्रीच्या वेळी सर्वत्र अंधार पसरलेला असतो. या भागात गल्ली, चौक, रस्त्यावर सर्वत्र अंधार असल्यामुळे नागरिकांची गैरसोय होत आहे. अंधार राहत असल्यामुळे या भागात असामाजिक तत्त्व सक्रिय झाले आहेत. यामुळे नागरिकांची चिंता वाढली असून या भागात स्ट्रीट लाईटची सुविधा उपलब्ध करून देण्याची मागणी नागरिक करीत आहेत. यासह अनेक समस्या नागरिकांना भेडसावत असून परिसरात नळ नसल्यामुळे आजही या भागात टँकरने पाणीपुरवठा करण्यात येतो. आठ दिवसातून एकदा टँकरद्वारे नागरिकांना पाणी मिळते. यामुळे नागरिकांना पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. तसेच याठिकाणी असलेल्या पिलीनदीचे रूपांतर आता नाल्यात झाले असून नागरीकांना संसर्गजन्य आजार होण्याचा धोका आहे.

रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडलेले आहेत. पावसाळ्यात खड्ड्यांमध्ये पाणी साचून राहात असल्याने नागरिकांना जाणे-येणे कठीण झाले आहे. पावसाळ्यात संपूर्ण वसाहतीला तलावाचे रूप येते. घराघरात पाणी शिरत असल्याने जनजीवन विस्कळीत होत असल्याची तक्रारही नागरिकांनी नागपूर टुडेशी बोलतांना केली.