| | Contact: 8407908145 |
    Published On : Fri, Jan 22nd, 2021

    Video : महिलांचा दारूबंदीसाठी एल्गार

    वर्धा / नागपुर :गट ग्रामपंचायत मांगली हद्दीतील नागपूर-वर्धा जिल्हा सीमेवरील दारूचे दुकान बंद करण्याकरिता स्थानिक महिलांनी ग्रामपंचायत कार्यालयावर मोर्चा काढुन दारूबंदीचा एल्गार पुकारला आहे.

    गट ग्रामपंचायत मांगली येथील ग्रामसेवक , सरपंच व सदस्यांनी कोरोनाच्या आडून ग्रामवासीयांना विश्वासात न घेता 21 जुलै 2020 रोजी परस्पर ठराव घेऊन गट ग्रामपंचायत मांगली हद्दीत दारूचे दुकान सुरू करण्याची परवानगी दिली. या दुकानामुळे येथील नागरिकांना त्रास होतो आहे. असामाजिक तत्वांना ऊत येत असून ग्रामवासीयांना अनेक सामाजिक, आरोग्यदायी समस्यांना सामोरे जावे लागत असून कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला.

    दारूचे दुकान तात्काळ बंद करण्यात यावे, अशी मागणी स्थानिक ग्रामस्थ व महिलांनी केली आहे. ग्रामवासीयांशी विश्वासघात करून दारुच्या दुकानाला परवानगी देणाऱ्या ग्रामपंचायतीमधील समितीला बरखास्त करावे अशीही मागणी करण्यात आली आहे.

    Trending In Nagpur
    Stay Updated : Download Our App
    Mo. 8407908145